महिंद्राने 1 लाखांहून अधिक गाड्या परत मागवल्या; समोर आला मोठा प्रॉब्लेम

टाइम्स मराठी । महिंद्रा कंपनी भारतातील ऑटोमोबाईल क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच महिंद्रा कंपनीने साऊथ आफ्रिका येथील केप टाउन मध्ये भविष्यामध्ये लॉन्च करण्यात येणाऱ्या गाड्या बद्दल माहिती दिली होती. यासोबतच महिंद्राने थार चे इलेक्ट्रिक व्हर्जन कन्सेप्ट देखील सर्वांसमोर ठेवली होती. यासोबतच महिंद्रा कंपनीने नवीन रेंज मध्ये इलेक्ट्रिक ट्रॅक्टर देखील लॉन्च केले होते. एकीकडे महिंद्राची भरारी सुरु असतानाच दुसरीकडे नुकत्याच आलेल्या माहितीनुसार, आता महिंद्रा कंपनीच्या काही गाड्यांमध्ये प्रॉब्लेम असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानुसार कंपनीने XUV700 आणि XUV400 या कार साठी रिकॉल जारी केले आहेत.

   

महिंद्रा कंपनीच्या XUV700 आणि XUV400 या कारचे 1.10 लाख युनिट रेकॉर्ड जारी केले आहे. या दोन्ही कारच्या इंजिनचे वायरिंग लुममध्ये घर्षण झाल्यामुळे वायर कट झाल्याची शक्यता वर्तवली आहे. कंपनीने 8 जून 2021 पासून 28 जून 2023 पर्यंत तयार करण्यात आलेले XUV700 चे 108,306 युनिट्स आणि 16 फेब्रुवारी 2023 पासून 5 जून 2023 या कालावधीमध्ये तयार करण्यात आलेल्या XUV400 EV च्या 3,560 युनिट्स मध्ये प्रॉब्लेम असल्याची शक्यता वर्तवली आहे.

याबाबत महिंद्रा कंपनीने सांगितलं की, ज्या गाड्यांमध्ये हा प्रॉब्लेम उद्भवला असेल त्या कार रिपेअर करून देण्यात येईल. यासाठी ग्राहकांकडून कोणत्याच प्रकारच्या चार्ज घेण्यात येणार नाही. महिंद्रा कडून या कार्स मध्ये ब्रेक पोटेंशियोमीटर मीटर मध्ये काही प्रॉब्लेम जाणवले आहे. या प्रॉब्लेमचे इन्स्पेक्शन करून हे प्रॉब्लेम सुधारण्यात येणार आहे. याबाबत XUV700 आणि XUV400 या दोन्ही कार्स च्या मालकांना कॉल करण्यात येणार आहे.

दरम्यान, महिंद्रा कंपनीने केप टाउन मध्ये आयोजित एका फ्युचरस्पेक इव्हेंट मध्ये आगामी प्रोडक्ट्स आणि इलेक्ट्रिक गाड्यांच्या स्टेटर्जी आणि डेव्हलपमेंट बद्दल माहिती दिली होती. हा इव्हेंट दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरु होता. हा या वर्षातील सर्वात मोठा इव्हेंट असल्याचं सांगण्यात येत आहे. महिंद्रा कंपनी येणाऱ्या काळात एक्सयुव्ही XUV आणि बॉर्न इलेक्ट्रिक BE या ब्रांड च्या माध्यमातून अनेक नवीन प्रॉडक्ट लॉन्च करणार आहे. यासोबतच कंपनी पाच टॉप सेलिंग एसयूव्ही बोलेरो आणि स्कार्पिओ एन, एक्सयूव्ही 700 या ब्रांड चे मॉडेल देखील लाँच करणार आहे.