Mahindra Thar.e : अशी दिसते महिंद्राची Electric Thar; लुक पाहून म्हणाल, क्या बात है!!

टाइम्स मराठी । महिंद्रा कंपनी भारतातील ऑटोमोबाईल क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी महिंद्रा थार ही कार 15 ऑगस्टला लॉन्च होणार असल्याची चर्चा सुरू होती. त्यानुसार आता केप टाउन मध्ये आयोजित एका ग्लोबल फ्युचर्सकॅप इव्हेंट मध्ये महिंद्राची इलेक्ट्रिक व्हर्जन थार चे कन्सेप्ट मॉडेल (Mahindra Thar.e) सादर करण्यात आले आहे. ही इलेक्ट्रिक SUV पूर्णपणे रीडिझाइन करण्यात आली असून यामध्ये कंपनीचा नवीन लोगो दिसणार आहे

   

फीचर्स –

महिंद्रा कंपनीच्या इलेक्ट्रिक थार ही (Mahindra Thar.e) 5 डोर वर्जन मध्ये उपलब्ध आहे. या कारचे ICE वर्जन पेट्रोल डिझेल मॉडेल मधील लॉन्च करण्यात येणार असून हे इलेक्ट्रिक व्हर्जन नसेल. महिंद्रा कंपनीने ही इलेक्ट्रिक थार जुन्या मॉडेलच्या तुलनेत मस्क्युलर आणि अग्रेसिव्ह बनवली आहे. हि थार आकर्षक आणि फ्युचरिस्टिक डिझाईन मध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे. यामध्ये स्क्वायर शेप मध्ये स्टायलिश एलईडी हॅन्डलॅम्प सह राऊंड ऑफ कॉर्नर आणि ग्लॉसी अप्राईज नोज देण्यात आले आहे. यासोबतच थारच्या व्हील्स बद्दल बोलायचं झालं तर स्क्वाड आउट व्हील आर्ट आणि नवीन अलोय व्हील यामुळे इलेक्ट्रिक थार ला नवीन लुक येतो. कारच्या मागच्या साईडला एक स्पेयर व्हील आणि स्कॉयर एलईडी टेललॅम्प देण्यात आले आहे.

Mahindra Thar.e 1

डिझाईन – (Mahindra Thar.e)

महिंद्रा इलेक्ट्रिक थारच्या इंटेरियर बद्दल बोलायचं झालं तर कंपनीने केबिन डॅशबोर्ड दोन्हींमध्ये नवीन डिझाईन दिली आहे. डॅशबोर्ड मध्ये मिनिमम डिझाईन करण्यात आलेली असून यामध्ये सर्वात मोठा टच स्क्रीन इन्फोटेक सिस्टीम आणि डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले यासोबतच नवीन स्टिअरिंग व्हील देखील देण्यात आली आहे. या महिंद्राच्या इलेक्ट्रिक थार ला INGLO p1 या प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात येणार असून ही लाईट वेट बॉडी कन्स्ट्रक्शन आणि एक्सपांडेड बॅटरी कॅपॅसिटी साठी तयार करण्यात येईल. यामुळे एसयुव्ही ला बेस्ट ग्राउंड क्लिअरन्स आणि ऑफ रोडींग क्षमता प्रदान करू शकते. त्याचबरोबर या एसयुव्हीला अतिरिक्त दरवाजे आणि बॅटरी पॅक फिट करण्यासाठी गाडीचा व्हील बेस 2775 mm ते 2,975 mm यामध्ये असेल .

कधी होणार लाँच –

महिंद्रा कंपनी XUV. e8 यासारख्या जुन्या मॉडेल साठी चिनी कंपनी बिल्ड युवर ड्रीम BYD यांच्याकडून INGLO बॅटरी आणि मोटर्स मागवणार आहे. यासोबतच या इलेक्ट्रिक थार मध्ये महिंद्रा कंपनी वोक्सवॅगन कडून देखील त्यापेक्षा जास्त पॉवरफुल इलेक्ट्रिक मोटर चा वापर देखील करू शकते. मिळालेल्या माहितीनुसार INGLO प्लॅटफॉर्म व्हील ड्राईव्ह साठी 250 kw पावर आउटपुट जनरेट करू शकते. ही महिंद्रा थार इलेक्ट्रिक कधी (Mahindra Thar.e) लॉन्च होणार आहे अजून सांगण्यात आलेले नसून कंपनीचे नवीन इलेक्ट्रिक विकल प्लांट 2024 मे सुरू करण्यात येणार आहे. त्यानुसार 2025 पर्यंत ही इलेक्ट्रिक थार लॉन्च करण्यात येऊ शकते.

महिंद्रा इलेक्ट्रिक थार कन्सेप प्रदर्शित केल्यानंतर कंपनीने इलेक्ट्रिक वाहनांमध्ये 75 वेगवेगळे साउंड वापरले आहेत. या साऊंड चा वापर कारचे दरवाजे खोलण्यापासून ते ड्रायव्हिंग मोड्स पर्यंत करता येऊ शकतो. या साऊंड्सला ऑस्कर विजेता आणि मशहूर भारतीय संगीतकार ए आर रहमान यांच्याद्वारे कंपोज करण्यात आले आहे. या इव्हेंट च्या वेळी इलेक्ट्रिक वाहनांसाठी नवीन लोगो देखील महिंद्रा कंपनीने लॉन्च केला. यासोबतच महिंद्राने कॉपर ट्विन पीक फक्त XUV400 मध्ये वापरण्यात येईल असं सांगितलं.