Mahindra Thar EV : महिंद्रा करणार धमाका!! ‘या’ दिवशी आणणार Thar चे Electric व्हर्जन

Mahindra Thar EV । महिंद्रा कंपनी भारतातील ऑटोमोबाईल क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. त्यातही महिंद्राची थार ही गाडी देशभरातील युवकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. आता जगात इलेक्ट्रिक गाड्यांचा ट्रेंड सुरु असून अनेक कंपन्या आपल्या गाड्या इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये बाजारात आणत आहेत, त्याचा पार्श्वभूमीवर महिंद्रा कंपनी सुद्धा आपली सर्वात लोकप्रिय गाडी महिंद्रा थार इलेक्ट्रिक अवतारात लाँच करणार आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये होणाऱ्या ग्लोबल इव्हेंट मध्ये महिंद्रा आपली इलेक्ट्रिक थार लोकांसमोर आणणार आहे.

   
Mahindra Thar EV 3

काय असतील फीचर्स- (Mahindra Thar EV)

महिंद्राच्या या इलेक्ट्रिक थार मध्ये ॲडव्हान्स फीचर्स देण्यात येऊ शकतात. यामध्ये देण्यात येणाऱ्या सेटअप मध्ये कारची चाकं 45 डिग्री अंशाच्या कोणात फिरू शकतात. हे ऑफ रोडिंग साठी उपयोगी ठरू शकते. यासोबतच ही कार कमी जागेमध्ये पार्क देखील केली जाऊ शकते. खास करून शिकाऊ कार ड्रायव्हर साठी महिंद्राची ही इलेक्ट्रिक थार परफेक्ट असून आवश्यक असेल तर ही कार 360 डिग्री मध्ये देखील वळवली जाऊ शकते. यासोबतच मिळालेल्या माहितीनुसार या कारमध्ये 4×4 सेटअप देण्यात येऊ शकते. हे एक कन्सेप्ट व्हर्जन असल्यामुळे यात किंमत आणि लॉन्चिंग डेट याबद्दल अजून कोणतीही माहिती मिळाली नाही.

Mahindra Thar EV 1

महिंद्रा कंपनीची ही इलेक्ट्रिक व्हर्जन असलेली थार (Mahindra Thar EV) लोकांमध्ये किती लोकप्रिय होईल हे सांगता येत नाही परंतु महिंद्रा कंपनीची महिंद्रा थार 4×4 ही आजच्या पिढीला भाळणारी कार आहे. यात दोन प्रकार उपलब्ध असून AX (O) आणि LX हे दोन प्रकार दोन्ही सॉफ्ट आणि हार्ड टॉप बॉडी मध्ये येतात. महिंद्रा कंपनीने थार 4×4 मध्ये दोन वेगवेगळे इंजिन पर्याय उपलब्ध करून दिले आहे. यात 2.0-लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले असून 150PS पॉवर आणि 320Nm टॉर्क जनरेट करते. त्याचबरोबर डिझेल वेरिएंटमध्ये 2.2-लिटर डिझेल इंजिन देण्यात आले आहे, जे 130PS ची पॉवर आणि 300Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअर बॉक्सेसशी जुळतात.