महिंद्राच्या ‘या’ कारवर मिळत आहे तब्बल 1 लाख रुपयांची सूट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

TIMES MARATHI | महिंद्रा कंपनी ही भारतातील ट्रस्टेड आणि पॉप्युलर ऑटो निर्माता कंपनी आहे. ही कंपनी मजबूत आणि टिकाऊ कार बनवण्यासाठी देखील ओळखले जाते. त्याचबरोबर या कंपनीने टाटा कंपनीला टक्कर देण्यासाठी इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये पदार्पण केले आहे. पदार्पण केल्यानंतर महिंद्रा कंपनीने XUV 400 इलेक्ट्रिक कार लॉन्च केली होती. आता कंपनीकडून महिंद्रा कंपनीची XUV 400 या इलेक्ट्रिक कारवर 1 लाख 25 हजार रुपयांपर्यंत सूट देण्यात येत आहे.

   

ऑफर

XUV 400 ही इलेक्ट्रिक कार XUV 300 पेक्षा बेस्ट असून हे या कारचे इलेक्ट्रिक व्हर्जन आहे. कंपनीने या इलेक्ट्रिक कारसोबत ट्विन पिक्स लोगो देखील लॉन्च केला होता. एवढेच नाही तर या लोगोसह लॉन्च होणारी ही पहिली महिंद्रा इलेक्ट्रिक कार आहे. या कारची सध्या बुकिंग सुरू असून या कारची किंमत 15.99 लाख रुपये एवढी आहे. आता कंपनीने या कारवर तब्बल एक लाख 25 हजार रुपयांची सूट दिली आहे. कंपनीने या ऑफर सोबत कोणत्याही फ्री ॲक्सेसरीज उपलब्ध करून दिलेल्या नाहीत.

स्पेसिफिकेशन आणि बॅटरी

XUV 400 या इलेक्ट्रिक कारमध्ये देण्यात आलेल्या बॅटरी बद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये 34.5 kWh लिथियम आयन बॅटरी उपलब्ध आहे. ही बॅटरी 7.2 KW आणि 3.3 kw चार्जिंग ला सपोर्ट करते. ही बॅटरी दोन चार्जिंग ऑप्शन मध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. एवढेच नाही तर चार्जिंग ऑप्शन्सह दोन बॅटरी पॅक देखील यामध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यापैकी पहिली बॅटरी 39.4 kWh पावर प्रदान करते दुसरी बॅटरी 34.5 kWh एवढी पावर प्रदान करते. यासोबतच पहिली बॅटरी 456 किलोमीटर आणि दुसरी बॅटरी 375 किलोमीटर एवढी रेंज देते.

मल्टी ड्राईव्ह मोड

XUV400 या इलेक्ट्रिक कारमध्ये देण्यात आलेली मोटर 150 बीएसपी पावर प्रदान करते आणि 310 nm पिक टॉर्क जनरेट करते. ही इलेक्ट्रिक कार 150 किलोमीटर प्रति घंटा टॉप स्पीड देते. 100 किमी प्रति घंटा स्पीड पकडण्यासाठी या कारला 8.3 सेकंद एवढा वेळ लागतो. या इलेक्ट्रिक कार मध्ये मल्टी ड्राईव्ह मोड देण्यात आले आहे. हे मोड रीजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टीम सह थॉटल ऍडजेस्ट करण्यास मदत करतात.