एक दिवस चंद्रावर उतरणार Mahindra Thar; आनंद महिंद्रानी शेअर केला खास Video

टाइम्स मराठी । महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा (Anand Mahindra) हे सोशल मीडियावर सतत सक्रिय असतात. आनंद महिंद्रा दररोज काही ना काही मजेशीर, आणि प्रेरणादायी पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत असतात आणि त्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल सुद्धा होत असतात. नुकतंच भारताने चंद्रावर यान पाठवल्यानंतर महिंद्रा यांनी ISRO च अभिनंदन केलं. यावेळी त्यांनी त्यांच्या मनातील इच्छाही बोलून दाखवली. तो दिवसही लांब नसेल ज्यादिवशी Mahindra Thar E आपल्याला चंद्रावर उतरलेली दिसेल असं आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत म्हंटल आहे.

   

काय आहे आनंद महिंद्रा यांचे ट्विट?

आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर शेअर केलेला हा केलेला व्हिडिओ हा अॅनिमेटेड आहे. 10-सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये चंद्राचा पृष्ठभाग दिसत आहे जिथे लँडर उभा आहे आणि त्याचे दार हळू हळू उघडते. दरवाज्यातून, महिंद्रा अँड महिंद्राचे नवीन थार-ई (महिंद्रा थार-ई) आतून खाली उतरते आणि चंद्राच्या जमिनीवर पुढे सरकत जाते. या व्हिडिओला कॅप्शन देत आनंद महिंद्रा म्हणाले, इस्रोने आमच्या महत्त्वाकांक्षेला उड्डाण दिले आहे, त्याबद्दल धन्यवाद. येत्या काळात महिंद्रा थार-ई विक्रम आणि प्रग्यानसोबत चंद्रावर उतरताना दिसणार आहे!

दरम्यान, आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेली ही पोस्ट वाऱ्यासारखी पसरली आहे. आत्तापर्यंत 4 लाखांहून अधिक लोकांनी ही पोस्ट बघितली असून यावर वेगवेगळ्या कमेंट्स देण्यात आलेल्या आहेत. आनंद महिंद्रा यांचे ट्विटरवर तब्बल 10.4 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. त्यांनी ट्विटरवर पोस्ट केलेल्या नवनवीन कल्पना आणि प्रेरक ट्विट युजर्सना खूप आवडतात त्यामुळे दिवसेंदिवस त्यांचे फॅन फॉलोअर्स हे वाढतच चालले आहेत.