माणूस बनला कुत्रा!! खर्च केले 18 लाख रुपये? पण गरज काय होती?

टाइम्स मराठी । व्यक्ती तितक्या प्रवृत्ती या नियमाप्रमाणे जग चित्र- विचित्र माणसांनी भरलेलं आहे. जगात कोण कधी काय करेल याचा नेम नाही. अशीच एक घटना जपानमधून समोर येत आहे. जपानमधील एका व्यक्तीने आपलं रूपांतर कुत्र्यामध्ये केलं आहे. त्यासाठी त्याने तब्बल १८ लाख रुपये आणि आपली ४० दिवसाची मेहनत वाया घालवली. टोको असं सदर व्यक्तीचे नाव आहे. परंतु नेमकं असं काय झालं कि त्या माणसाने आपलं कुत्र्यांमध्ये परिवर्तन केलं हेच आज आपण जाणून घेऊयात.

   

झेपेट नावाच्या कंपनीने या जपानी माणसाला कुत्र्याचे रूप तयार करण्यासाठी मदत केली आहे. माणसाचे कुत्र्यामध्ये रूपांतर करण्यासाठी तब्बल ४० दिवस लागले. तसेच या व्यक्तीने १८ लाख रुपये यासाठी खर्च केले. टोको ने आपला बागेत फिरतानाचा एक विडिओ सुद्धा ट्विटरवर शेअर केला आहे. ज्यामध्ये तो लोकांशी मौजमजा करता दिसत आहे. टोको बाकीच्या कुत्र्यांशी खेळताना आणि एखाद्या प्राण्याप्रमाणे जमिनीवर लोळताना दिसत आहे. मला प्राणी व्हायचे आहे या नावाने हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ 1 दशलक्षाहून अधिक वेळा बघितला गेला असून लोकांनी अनेक मजेशीर प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

टोकोने यापूर्वीच सांगितलं होते की, त्याला लहानपणापासूनच हा छंद होता, परंतु त्याच्या आजूबाजूच्या लोकांना याबद्दल माहिती पडायला नको असं त्याला वाटतं होते. जर लोकांना माहित झाले तर त्यांना हे विचित्र वाटेल की मला कुत्रा व्हायचे आहे. त्यामुळे मी आता माझा खरा चेहरा दाखवू शकत नाही असेही टोकोने म्हंटल.