पाण्यावर तरंगतोय हा तरुण, Video पाहून तोंडात बोटे घालाल, पण यामागील विज्ञान समजून घ्या

टाइम्स मराठी । सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओज कधी एंटरटेनमेंट करतात. तर कधी धक्कादायक सुद्धा असतात. स्टंट करून संपूर्ण जगाचे लक्ष्य आपल्याकडे वेधणारे सुद्धा काय कमी नाहीत. अशाच प्रकारचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर काही दिवसांपासून व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आश्चर्यकारक असून पाण्यामध्ये एखादा व्यक्ती तरंगू शकतो हा प्रश्न तुम्हाला देखील पडेल.

   

काय आहे व्हिडिओत –

हा व्हिडिओ ट्विटरच्या माध्यमातून Fascinating नावाच्या आयडी वरून शेअर करण्यात आलेला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये चहू बाजूने काळी माती आणि मध्यभागी एक स्वच्छ पाण्याचा तलाव दिसत आहे. या पाण्यामध्ये एक व्यक्ती उतरतो, आणि स्वतःला सेट करत पूर्ण पाण्यात गेल्यावर त्या पाण्यावर पूर्णपणे झोपतो. जसं की हा व्यक्ती जमिनीवर निळ्या हिरव्या रंगाची चादर टाकून झोपलेला आहे. पण खरच अशा प्रकारे कोणी पाण्यावर झोपू शकतो का? हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल.

या तलावाच्या चारही बाजूंनी काळी माती आहे. आणि मध्ये स्वच्छ पाण्याचा तलाव दिसत आहे. हा तलाव खूप खोल असून नेमकं ही जागा कोणती असावी, त्याचबरोबर एखादा व्यक्ती तलावात उतरतो आणि आरामात कसं झोपू शकतो असे प्रश्न तुम्हाला नक्की पडतील. महत्त्वाचे म्हणजे बऱ्याचदा स्विमिंग चे क्लास केलेल्या व्यक्तींना किंवा पोहायला शिकलेल्या व्यक्तींना पाण्याच्या वर येण्यासाठी कशाप्रकारे हातपाय मारायचे हे त्यांना माहिती असतं. पण या तलावामध्ये उतरलेला व्यक्ती अशाप्रकारे पाण्यावर निवांत झोपू शकेल का? ही आश्चर्याची गोष्ट आहे.

परंतु हा विडिओ म्हणजे काही जादू वगैरे नाही, किंवा त्या तरुणाने हा विडिओ एडिटही केलेला नाही, तर यामागे विज्ञान आहे. हा माणूस पाण्यावर कसा तरंगू शकतो याचे उत्तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तर याचे कारण हेच आहे कि, ज्या तलावाच्या पाण्यात हा व्यक्ती तरंगत आहे त्या पाण्यामध्ये 95 टक्के मीठ असल्यामुळे पाण्याची घनता खूप जास्त आहे. त्यामुळे या तलावात कोणीही बुडू शकत नाही.

हा विडिओ पाहिल्यानंतर बऱ्याच जणांनी कमेंट केल्या आहेत. एका युजर ने कमेंट केली आहे की, एवढे मीठ असेल तर न बुडून देखील नुकसानच होऊ शकते. तर काही युजरने कमेंट मध्ये लिहिलं की जास्त वजन असलेले लोकही हे करू शकतात का? हा व्हिडिओ आतापर्यंत 176.3 k युजर्स ने लाईक केला असून 1.4 k युजर्सने यावर कमेंट केली आहे.