टाईम्स मराठी । गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून एक घटना प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. ही घटना बघून तुमच्याही तोंडातून आश्चर्यजनक उदगार निघतील. महाराष्ट्रातील नागपूर येथील एका 60 वर्षाचा व्यक्ती 36 वर्षापर्यंत प्रेग्नेंट राहिल्याची घटना उघड झाली आहे. या घटनेमुळे लोकच नाही तर डॉक्टर देखील हैराण आहेत. या 36 वर्षापर्यंत प्रेग्नेंट राहिलेल्या व्यक्तीच्या पोटातून 36 वर्षानंतर जुडवा मुले काढण्यात आली. 21 व्या शतकात या घटनेवर कोणाचाच विश्वास बसणार नाही.
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना नागपूर येथील असून संजय बघेल असं या व्यक्तीचे नाव आहे. हे शेतकरी असून त्यांचे पोट जास्त फुगलेले होते. जास्त फुगलेल्या पोट मुळे त्याला सतत श्वास घ्यायला त्रास होत होता. आश्चर्यकारक म्हणजे लहानपणापासूनच त्यांचं पोट वाढायला लागलेलं होतं. हे वाढलेलं पोट बघून त्याला सर्वजण प्रेग्नेंट आदमी म्हणून सर्वजण चिडवत होते पण हे खरं ठरेल असं कोणालाच वाटलं नाही.
संजय बघेल यांची वयाच्या 36 व्या वर्षी तब्येत बिघडली आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांचं फुगलेलं पोट बघून डॉक्टरांनी वेगळाच अंदाज लावला. डॉक्टरांना त्यावेळी वाटले की या व्यक्तीला ट्यूमर झालेला असेल. पण जेव्हा ऑपरेशन थेटर मध्ये नेऊन सर्जरी करण्यात आली तेव्हा त्या व्यक्तीच्या पोटातून दोन जुळे भ्रूण काढण्यात आले. या घटनेने डॉक्टर देखील आश्चर्यचकित झाले आहे.
डेली स्टार न्यूजच्या म्हणण्यानुसार, ही घटना 1999 मधली असून सर्जरी झाल्यानंतर हा व्यक्ती वाचला आणि सध्या तो साधारण जीवन जगत आहे. 21 व्या शतकाच्या सुरुवातीला या घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे. वैद्यकीय तज्ञांच्या मते ही केस अतिशय दुर्लभ मेडिकल कंडिशन होती. पाच लाखांमधून एक असलेल्या या घटनेला वैनिशिंग ट्वीन सिंड्रोम असं म्हटलं जातं.