Maruti Suzuki च्या ‘या’ कारवर मिळतोय 45 हजार रुपयांचा डिस्काउंट

टाइम्स मराठी । भारतामध्ये सर्वत्र फेस्टिवल सीजन सुरू आहे. लवकरच आता दसरा हा सण सुरू होणार आहे. त्यानिमित्ताने बरेच जण कार खरेदी करण्याचा विचार करत असतात. भारतामध्ये सणासुदीच्या दिवशी कार खरेदी करणे हे शुभ मानले जाते. त्यानुसार बऱ्याच निर्माता कंपन्या त्यांच्या प्रॉडक्टवर या सीझनच्या माध्यमातून कमी किमतीमध्ये आणि डिस्काउंट ऑफर नुसार कार विक्री करत असतात. त्याचबरोबर आता बऱ्याच वाहन निर्माता कंपन्यांनी त्यांच्या कार्सवर आणि प्रॉडक्टवर बंपर डिस्काउंट ऑफर सुरू केल्या आहेत. तुम्ही देखील या फेस्टिवल सीझनमध्ये कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मारुती सुजुकी ही ऑटोमोबाईल निर्माता कंपनी  Maruti Brezza या कारवर बम्पर डिस्काउंट ऑफर करत आहे. जाणून घेऊया काय आहे ऑफर .

   

ऑफर

मारुती सुझुकीची बेस्ट सेलिंग कॉम्पॅक्ट Maruti Brezza या मॉडेलवर कंपनीकडून फेस्टिवल सिझनच्या माध्यमातून डिस्काउंट ऑफर देण्यात येत आहे. कंपनीने ही कार 2022 मध्ये नवीन लूक आणि डिझाईन मध्ये लॉन्च केली होती. नवरात्री स्पेशल डिस्काउंट ऑफर नुसार कंपनीकडून या कारवर 45 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट ऑफर देण्यात येत आहे. एवढेच नाही तर या कारच्या CNG व्हेरियंटवर देखील डिस्काउंट देण्यात येत आहे. Maruti Brezza च्या पेट्रोल MT आणि AMT व्हेरिएंट वर 45 हजार रुपयांपर्यंत तर CNG व्हर्जन वर 20,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट ऑफर देण्यात येत आहे.

स्पेसिफिकेशन

Maruti Brezza या SUV मध्ये1.5 लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे पेट्रोल इंजिन 103 BHP पावर आणि 137 NM पीक टॉर्क जनरेट करते. कंपनीने या इंजिन सोबत पाच स्पीड मॅन्युअल आणि पाच स्पीड ऑटोमॅटिक गिअर बॉक्स उपलब्ध केले आहेत. त्याचबरोबर CNG व्हेरियंटमध्ये मॅन्युअल ट्रान्समिशन उपलब्ध करण्यात आले आहे. Maruti Brezza चे ऑटोमॅटिक व्हेरिएंट 19.8 किलोमीटर प्रति लिटर एवढे मायलेज देते. CNG व्हेरिएंट 25.51 किलोमीटर प्रति किलोग्रॅम एवढे मायलेज देते.

फिचर्स

Maruti Brezza या एसयूव्हीमध्ये कंपनीने वेगवेगळे अपडेटेड फीचर्स उपलब्ध केले आहे. त्यानुसार यामध्ये वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि एप्पल कार प्ले उपलब्ध आहे. यासोबतच नऊ इंच टच स्क्रीन इम्फोटेनमेंट सिस्टीम देखील यामध्ये देण्यात आली आहे. या SUV मध्ये चार स्पीकर साऊंड सिस्टिम 360 डिग्री कॅमेरा, वायरलेस फोन चार्जर, सिंगल पॅन सनरुफ आणि एम्बीएन्ट लाइटिंग यासारखे फीचर्स देण्यात आले आहे. Maruti Brezza या SUV मध्ये पेंडल शिफ्टर्स आणि हेड अप डिस्प्ले यासारखे ऍडव्हान्स फीचर्स देखील उपलब्ध आहेत. मारुती ब्रेझा ही ह्युंदाई वेन्यू, किआ सोनेट, महिंद्रा एक्सयुव्ही 300, टाटा नेक्सन, रेनॉल्ट कायगर आणि निसान मॅग्नाइट सोबत प्रतिस्पर्धा करते.