Maruti Car Discount : दिवाळीनिमित्त मारुतीच्या ‘या’ Car वर 50000 रुपयांपर्यंत डिस्काउंट

Maruti Car Discount : दिवाळीसाठी आता हातावर मोजण्या एवढेच दिवस उरले आहेत. दिवाळीनिमित्त अनेक वस्तूंवर सेल सुरु असतो, आणि ग्राहकांना कमी पैशात वस्तू देऊन आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्नही अनेक कंपन्या करत असतात. अनेकजण दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गाडी खरेदी करत असतात. त्यानुसार, तुम्ही सुद्धा यंदाच्या दिवाळीत नवी गाडी घरी आणण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण दिवाळी निमित्त प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी Maruti सुजूकी आपल्या S-Presso या कारवर 50000 रुपयांपर्यंत बंपर सूट देत आहे.

   

ऑफरMaruti Car Discount

मारुती कंपनी भारतीय बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या सेगमेंट मध्ये कार लॉन्च करत असते. त्यानुसार मारुती कंपनीची S-Presso ही कार खरेदी करण्याचा तुम्ही विचार करत असाल तर तुम्हाला बंपर डिस्काउंट (Maruti Car Discount) ऑफरचा लाभ घेता येऊ शकतो. या ऑफरनुसार तुम्हाला मारुती एस प्रेसो कारच्या खरेदीवर 50 हजार रुपयांचा लाभ होऊ शकतो. कारण कंपनी S-Presso या कार खरेदीवर 30000 रुपयांचा डिस्काउंट, 20,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस, 4000 रुपयांची कॉर्पोरेट सूट देत आहे. यामुळे तुमचा अप्रतिम फायदा होऊ शकतो.

स्पेसिफिकेशन

Maruti Suzuki S-Presso ही कार 4.26 लाख रुपये  एक्स शोरूम किमतीमध्ये उपलब्ध असून या कारच्या टॉप वेरीएंट ची किंमत  6.12 लाख रुपये आहे. ही कार पेट्रोल आणि CNG या दोन्ही इंजिन ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे. यामध्ये 1.0 लिटर  पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजन 66 bhp पावर आणि 89  nm पीक टॉर्क जनरेट करते. मारुती सुझुकीची ही पेट्रोल वर चालणारी कार 25.30 किलोमीटर प्रति लिटर एवढे मायलेज देते. या कारमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही ट्रान्समिशन उपलब्ध करण्यात आले आहे.

फिचर्स

Maruti Suzuki S-Presso या कारमध्ये स्टार्ट आणि स्टॉप बटन, ऍडजेस्टेबल ORVM यासारखे फीचर्स देण्यात आले आहे. यासोबतच स्मार्ट प्ले इम्पोर्टेनमेंट सिस्टीम, माऊंटेड इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, स्पीड अलर्ट , हिल होल्ड असिस्ट, यासारखे ऍडव्हान्स फीचर्स देण्यात आले आहे. हिल होल्ड असिस्ट या फीचरमुळे  कार पहाडावरून किंवा उंचावरून मागे सरकत नाही. यासोबतच कार मध्ये ड्रायव्हर साठी आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सेफ्टी फीचर्स देखील देण्यात आले आहे.