फक्त देशातच नव्हे तर विदेशातही धुमाकूळ घालत आहेत ‘या’ Made In India गाड्या

टाइम्स मराठी | भारतीय बाजारपेठेत अनेक कार उत्पादक कंपन्या आहेत. या कार कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी एकापेक्षा एक कार बाजारात आणत आहेत. त्यामुळेच भारत देश हा जगातील तिसऱ्या नंबरचा सर्वात मोठा वाहन उद्योग केंद्र बनला आहे. भारतात बनवण्यात आलेल्या अनेक कार आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील मोठ्या प्रमाणात विकल्या जात आहेत. गेल्या एप्रिल 2022 ते 4 मार्च 2023 दरम्यान भारतातील 40 लाखांहून अधिक वाहनांची विक्री ही परदेशात झाली आहे. मुख्य म्हणजे, भारतातील काही विशेष कंपन्यांच्या कारची क्रेझ बाहेरील देशात देखील दिसून येत आहे. आज आपण याच कारविषयी जाणून घेणार आहोत.

   

1) Maruti Dzire

मारुती कंपनीच्या कार भारतातच नाही तर भारताबाहेरील देशात देखील विकल्या जात आहेत. यातील, Maruti Dzire कार गेल्या काही वर्षांत सर्वाधिक विकली गेली आहे. गेल्या 2016 मध्ये कंपनीकडून या कारचे लॉन्चिंग करण्यात आले होते. त्यानंतर ही कार आजपर्यंत सर्वात जास्त लोकप्रिय ठरली आहे. इतकेच नव्हे तर बाहेरील देशांमध्ये निर्यात करण्यात आलेल्या टॉप मॉडेलमध्ये मारुती डिझायरचा समावेश आहे. मारुती कंपनीने इतर देशांमध्ये डिझायरच्या ४८,०४७ युनिट्सची विक्री केली आहे. त्यामुळे ही कार बाहेर देशात सर्वात जास्त विकली जाणारी कार ठरली आहे. या कारची किंमत 6.44 लाख ते 9.31 लाख रुपये इतकी आहे.

2) Maruti Suzuki Baleno

Maruti Baleno भारतीय बाजारपेठेत सर्वाधिक विकली जाणारी हॅचबॅक कार आहे. तर ही कार इतर देशांमध्ये सर्वाधिक विक्री होणारी दुसरी कार ठरली आहे. मारुती सुझुकीने एप्रिल 2022 ते मार्च 2023 दरम्यान हॅचबॅकच्या 45,332 युनिट्सची निर्यात केली आहे. गेल्या वर्षी कंपनीने बलेनो फेसलिफ्ट विशेष अपडेट्ससह लॉन्च केली होती. या कारमध्ये 1.2 लीटर ड्युअल जेट पेट्रोल इंजिन आहे. जे 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सला जोडलेले आहे. या कारची किंमत 6.61 लाख रुपयांपासून सुरू होते. तसेच, Alpha AMT प्रकारासाठी 9.88 लाख रुपयांपर्यंत जाते.

3) Maruti Suzuki Swift

मारुती सुझुकी ही देशाबाहेर विकल्या जाणाऱ्या कारमध्ये तिसऱ्या क्रमांकाची कार्य ठरली आहे. मारुती सुझुकीने या हॅचबॅकच्या 32,862 युनिट्सची निर्यात केली आहे. ही कार पेट्रोल आणि CNG दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. या कारमध्ये 1.2 लीटर 4-सिलेंडर, नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड ड्युअल जेट, के-सिरीज इंजिन आहे. हे इंजिन 6,000 rpm वर 87.7 bhp ची पॉवर आणि 4,400 rpm वर 113 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. सुझुकी स्विफ्टची किंमत LXi MT व्हेरियंटसाठी 5.99 लाख रुपयांपासून सुरू आहे.

4) Kia Seltos

बाहेरील देशांमध्ये सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या कार मध्ये Kia Seltos या कारचा देखील समावेश आहे. Kia ने गेल्या वर्षी एप्रिल ते मार्च 2023 काळात जागतिक स्तरावर SUV च्या 31,793 युनिट्सची निर्यात केली आहे. Kia Seltos ची किंमत तब्बल 10.90 लाख रुपयांपासून सुरू आहे. तर Seltos X-Line डिझेल AT प्रकारासाठी 19.70 लाखांपर्यंत जाते. या कारमध्ये देण्यात आलेल्या वेगवेगळ्या फीचर्स मुळे बाहेरील देशांमध्ये Kia सर्वात जास्त विकली जात आहे. भारतात Kia Seltos देशाबाहेर विकली जाणारी तिसऱ्या नंबरची कार आहे.