टाइम्स मराठी टीम । मारुती सुझुकी आपली सर्वात मागडी कार लवकरच बाजारात दाखल करणार आहे. Maruti Engage असं या कारचे नाव असून कंपनीने नुकतीच याबाबत घोषणा केली आहे. Toyota कंपनीच्या Innova ला टक्कर देण्यासाठी मारुतीने हि नवीन कार बनवली असल्याचे बोलले जात आहे. तसेच या कारला इंनोव्हाच्या आधारावर बनवलं असून हिला ऑटो इंडस्ट्रीत Innova चे मारुती सुझुकी व्हर्जन असंही म्हटलं जात आहे.
मारुती सुझुकीची Maruti Engage हि प्रीमियम 7-सीटर MPV कार भारतात 5 जुलै रोजी पदार्पण करणार आहे. ही MPV कार टोयोटा इनोव्हावर आधारित असेल. भारतातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या मारुती सुझुकी कंपनीने कारचा टिझर लाँच केला असून अद्याप संपूर्ण गाडीवरील पडदा उठलेला नाही. मारुती कंपनी Engage MPV कारच्या पेट्रोल आणि हायब्रीड अशा दोन मॉडेल आणणार आहे.
हायब्रीड तंत्रज्ञानाने सज्ज
या वर्षी एप्रिलमध्ये, Fronx आणि Jimny SUV लाँच केल्यानंतर मारुती सुझुकीने Engage थ्री-रो प्रीमियम MPV कारची सुद्धा घोषणा केली होती. एंगेज एमपीव्ही मजबूत हायब्रीड तंत्रज्ञानासह एक प्रीमियम वाहन असेल. आता आमच्या या कारची किती विक्री होतेय हे ती बाजारात आल्यावरच समजेल. परंतु आम्हाला या कारकडून खूप अपेक्षा आहेत असे मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष आर.सी. भार्गव म्हणाले.
इंजिन
नवीन Maruti Suzuki Engage MPV (Maruti Suzuki Engage MPV) 2.0-लिटर पेट्रोल इंजिन आणि हायब्रीड तंत्रज्ञानासह तसेच विना हायब्रीड तंत्रज्ञान अशा दोन व्हेरियंट मध्ये उपलब्ध असेल. 2.0-लिटर मजबूत हायब्रिड व्हेरियंट 186PS कमाल पॉवर आणि 206Nm टॉर्क जनरेट करते. हे ई-सीव्हीटी गिअरबॉक्ससह असेल. 2.0 लिटर पेट्रोल मोटर 174PS कमाल पॉवर आणि 205Nm टॉर्क जनरेट करते. इंजिनला CVT ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मिळू शकते.
वैशिष्ट्ये
नवीन मारुती MPV ला खास इंटीरियर डिझाईन देण्यात आली आहे. बाकी कारची वैशिष्ट्ये इनोव्हा हायक्रॉस सारखीच असतील असं बोललं जात आहे. ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम (ADAS) ऑफर करणारे हे इंडो-जपानी ऑटोमेकरचे पहिले मॉडेल असेल. यामध्ये 360 डिग्री कॅमेरा, ऑटोमन फंक्शनसह दुसऱ्या रांगेतील सीट्स, नवीन 10-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, ड्युअल पेन पॅनोरमिक सनरूफ यांसारखी वैशिष्ट्ये देखील मिळतील.