Maruti Jimny 18.60 लाख रुपयांत लॉन्च; पहा काय फीचर्स मिळतात?

टाइम्स मराठी । Maruti Suzuki कंपनीने ऑस्ट्रेलिया मार्केटमध्ये Maruti Jimny SUV लॉन्च केली आहे. ऑस्ट्रेलिया मार्केट हे दक्षिण आफ्रिका नंतरचे दुसरे प्रमुख विदेशी मार्केट आहे. या मार्केटमध्ये कंपनीने आपली ही प्रसिद्ध कार लाँच केली आहे. कंपनीने ही 5 डोर मॉडेल कार AUD 34,990 म्हणजेच भारतीय चलना नुसार 18.60 लाख रुपयांत लॉन्च केली आहे. आज आपण जाणून घेऊया या SUV चे फिचर्स आणि स्पेसिफिकेशन.

   

स्पेसिफिकेशन

Maruti Jimny SUV XL मध्ये 1.5 लिटर 4 सिलेंडर नॅचरली अस्पिरेटेड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 100 BHP पावर आणि 130 nm पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिन सोबत 5 स्पीड मॅन्युअल आणि 4 स्पीड  ऑटोमॅटिक गीयरबॉक्स असे 2 गिअरबॉक्स ऑप्शन देण्यात आले आहेत. या मॅन्युअल गिअरबॉक्स सह हे नवीन एडिशन मॉडेल 16.94 kmpl आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह  16.39 kmpl मायलेज देते.

फीचर्स

Maruti Jimny SUV मध्ये ऑलग्रीप प्रो 4WD सिस्टीम देण्यात आली आहे. ज्यामध्ये मॅन्युअल ट्रान्सफर केस आणि 2WD High , 4 WD Low, मोड सोबतच लो रेंज गिअरबॉक्स मिळतात. या SUV मध्ये 3 लिंक हार्ड एक्सल सस्पेन्शन, इलेक्ट्रॉनिक ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टीम, 210  mm ग्राउंड क्लिअरन्स  देण्यात आले आहे.

सेफ्टी फीचर्स

भारतात लॉन्च करण्यात आलेल्या Maruti Jimny SUV प्रमाणे फीचर ऑस्ट्रेलियामध्ये लॉन्च करण्यात आलेल्या jimny मध्ये बघायला मिळाले. यामध्ये जेटा, अल्फा आणि अल्फा एटी हे तीन व्हेरीएंट लॉन्च करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलिया मॉडेल मध्ये कंपनीने ADAS, ॲडव्हान्स ड्रायव्हर असिस्टंट सिस्टीम , ऑटो इमर्जन्सी ब्रेकिंग, अडॅप्टीव्ह क्रूज कंट्रोल, अँटी कोलिजन वार्निंग आणि ड्युअल कॅमेरा ब्रेक सपोर्ट यासारखे फीचर्स उपलब्ध केले आहे.

किंमत किती?

Maruti Jimny SUV हे मॉडेल भारतात याच वर्षी जून महिन्यात लॉन्च करण्यात आले होते. त्यावेळी या मॉडेलची किंमत 12.74 लाख रुपये ठेवण्यात आली होती. यासोबतच या महिन्याच्या सुरुवातीलाच jimny thunder Edition मॉडेल 10.74 लाख रुपयांच्या किमतीत लॉन्च करण्यात आले होते.