Maruti Jimny Thunder Edition : Maruti ने लाँच केलं Jimny चे Special Edition; पहा किंमत

Maruti Jimny Thunder Edition : मारुती सुझुकीने ऑफरोड SUV Jimny चे नवीन लिमिटेड एडिशन लॉन्च केले आहे. या लॉन्च करण्यात आलेल्या  लिमिटेड एडिशनचे नाव मारुती जिम्नी थंडर एडिशन आहे. हे लिमिटेड एडिशन जेटा आणि अल्फा या दोन ट्रिम्समध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. या एडिशन ची किंमत 10.74 लाख रुपये ते 14.5 लाख रुपयांपर्यंत आहे. यामध्ये कंपनीने बरेच कॉस्मेटिक बदल केले आहे. यासोबतच या नवीन एडिशन मध्ये बरेच फीचर्स देखील देण्यात आले आहे. आज आपण जाणून घेऊया या मारुती जिम्नी थंडर एडिशन चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन.

   

फिचर्स आणि डिझाईन– Maruti Jimny Thunder Edition

Maruti Jimny Thunder Edition मध्ये फ्रंट बम्पर, ORVM, बोनट आणि साईड फेंडर वर स्पेशल गार्निश दिले आहे. आणि एक्स्ट्रा ॲक्सेसरीज मध्ये साईड डोअर क्लेंडिंग, फ्रंट स्किड प्लेट, डोर सिल गार्ड, स्पेशल ग्राफिक्स  यांचा समावेश आहे. या एडिशनच्या इंटरियर मध्ये खास मॅट फ्लोअर आणि ग्रीप कव्हर्स हे रस्टिक टॅन शेड मध्ये देण्यात आले आहे. या SUV मध्ये ऍक्टिव्ह स्टील व्हील्स, ड्रिपरेल आणि वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्ले कनेक्टिव्हिटी, 7 इंच स्मार्टप्ले  टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, अल्फा ग्रेड अलॉय व्हील, बॉडी कलर मध्ये डोअर हँडल, वॉशर सह LED ऑटो हेडलॅम्प, फॉग लॅम्प, क्रूज कंट्रोल, लेदर स्टिअरिंग व्हील, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल 9 इंच स्मार्टप्ले प्रो, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, साऊंड  यासारखे फीचर्स  मिळतात.

जेटा व्हेरिएंट फीचर

जेटा व्हेरिएंट मध्ये वॉशर सोबत फ्रंट आणि रियर वायपर, डे आणि नाईट  IRVM, पिंच गार्डसह ड्राइवर साईड पावर विंडो ऑटो अप डाऊन, रिक्लायनेबल फ्रंट सीट, माऊंटेड कंट्रोल सह मल्टीफंक्शनल स्टिअरिंग व्हील्स, TFT कलर डिस्प्ले,  फ्रंट आणि रियर सीट एडजेस्टेबल हेडरेस्ट, फ्रंट आणि रियर वेल्डेड टो हुक यासारखे फीचर्स देण्यात आले आहे.

स्पेसिफिकेशन

Maruti Jimny Thunder Edition मध्ये रेगुलर मॉडेल प्रमाणेच  1.5 लिटर 4 सिलेंडर नॅचरली अस्पिरेटेड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 105 BHP पावर आणि 134 nm पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिन सोबत दोन गिअरबॉक्स ऑप्शन देण्यात आले आहे. यामध्ये 5 स्पीड मॅन्युअल आणि 4 स्पीड टॉर्क कन्वर्टर ऑटोमॅटिक  यांचा समावेश होतो. या मॅन्युअल गिअरबॉक्स सह हे नवीन एडिशन मॉडेल 16.94 kmpl आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह  16.39 kmpl मायलेज देते.

ऑलग्रीप प्रो 4WD सिस्टीम

Maruti Jimny Thunder Edition मध्ये ऑलग्रीप प्रो 4WD सिस्टीम देण्यात आली आहे. ज्यामध्ये मॅन्युअल ट्रान्सफर केस आणि 2WD High , 4 WD Low, मोड सोबतच लो रेंज गिअरबॉक्स मिळतात. या लँडर फ्रेम चेसिस वर डेव्हलप करण्यात आलेल्या एसयूव्हीमध्ये 3 लिंक हार्ड एक्सल सस्पेन्शन, इलेक्ट्रॉनिक ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टीम, 210  mm ग्राउंड क्लिअरन्स  देण्यात आले आहे. ज्याची लांबी रुंदी आणि उंची  3985 mm, 1645 mm 1720 mm एवढी आहे. आणि या एसयूव्हीच्या व्हीलबेस ची लांबी 2590 mm आहे.

सेफ्टी फीचर

या जिम्नी थंडर एडिशन मध्ये सेफ्टी साठी स्टॅंडर्ड ड्युअल फ्रंट एअरबॅग, साईड आणि कर्टेन एअरबॅग, ब्रेक लिमिटेड स्लीप  डिफरेन्ट्शियल, EBD सह अँटी लॉक ब्रेक, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम, हिल होल्ड कंट्रोल, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, हिल डिसेंट कंट्रोल, साईड इफेक्ट डोर बीम, इंजिन इमोबिलायझर, थ्री पॉईंट इमर्जन्सी लॉकिंग रिट्रॅक्टर सीट बेल्ट  यासारखे फीचर्स देण्यात आले आहे.

किंमत किती?

या लॉन्च करण्यात आलेल्या  जिम्नी थंडर एडिशन मध्ये कॉस्मेटिक अपडेट्स बघायला मिळतात. या SUV च्या किमती बद्दल बोलायचं झालं तर, जेटा AT ची किंमत 11.94 लाख रुपये, अल्फा MT ची किंमत 12.69 लाख रुपये, अल्फा MT DT ची किंमत 13.89 लाख रुपये  आणि अल्फा  AT DC ची किंमत 14.5 लाख रुपये आहे.