Maruti Alto चा मोठा विक्रम!! ठरली भारतातील सर्वाधिक विक्री होणारी Car

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेमध्ये उपलब्ध असलेल्या परवडणाऱ्या कार पैकी एक कार म्हणजे मारुती सुझुकी अल्टो. (Maruti Suzuki Alto) या कारने भारतीयांच्या मनावर 23 वर्षापासून अधिराज्य गाजवलं आहे. सर्वप्रथम मारुती अल्टो 27 सप्टेंबर 2000 मध्ये लॉन्च करण्यात आली होती. त्यानंतर आत्तापर्यंत या कारची विक्री सुरू आहे. नुकत्याच आलेल्या माहितीनुसार मारुती सुजुकी अल्टोने विक्रीचा एक नवीन रेकॉर्ड बनवला आहे. देशातील सर्वात जास्त विकली जाणारी कार म्हणून अल्टो देशात नंबर 1 ठरली आहे.

   

मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड ने याबद्दल घोषणा करून याबद्दल माहिती दिली. भारतातील सर्वात जास्त पसंत केली जाणारी मारुती सुझुकी अल्टोने आतापर्यंत 45 लाख पेक्षा जास्त युनिटची विक्री केली आहे. अल्टो ही दशकांपासून एन्ट्री लेव्हल हैचबैक खरेदी करणाऱ्यांची पहिली पसंत आहे. त्याचबरोबर बेस्ट मायलेज आणि कमी मेंटेनन्स यामुळे ग्राहकांच्या पसंतीस जास्त प्रमाणात ही कार उतरते. मारुती सुझुकीच्या सेल्स सीनियर एक्झिक्युटिव्ह ऑफिसर शशांक श्रीवास्तव यांनी सांगितलं की, ऑटो इंडस्ट्रीज मध्ये अल्टो सतत नवीन बेंच मार्क सेट करत असते. भारतातील तरुणांची लोकसंख्या आणि वाढत्या उत्पन्नाचा पातळीमध्ये सर्वात फेवरेट कार म्हणून अल्टो कडे बघितलं जाते. मागच्या महिन्यामध्ये मारुती सुझुकी ने अल्टो आणि एस प्रेसो च्या 9590 युनिटची विक्री केली असून सियाज च्या 1348 युनिट्स ची विक्री केली. त्याचबरोबर एन्ट्री लेवल अल्टो के टेन या कारच्या कमी मागणीमुळे मागच्या महिन्यात 26% घट नोंदवण्यात आली

मारुती सुझुकी अल्टो 2000 मध्ये लॉन्च झाल्यानंतर 2004 मध्ये ही देशातील सर्वात जास्त विकली जाणारी कार म्हणून ओळखली गेली होती. मारुती सुझुकी ने 2010 मध्ये अल्टो K10 लॉन्च केली होती. त्यानंतर 2012 मध्ये कंपनीने 20 लाख विक्री चा आकडा पार केला होता. त्यानंतर 2016 मध्ये हा आकडा 30 लाखांपर्यंत पोहोचला होता. आणि 2020 मध्ये 40 लाख पेक्षा जास्त विक्री या कारची झाली होती.

सध्या मारुती अल्टोची K10 ही कार विक्रीसाठी उपलब्ध असून या गाडीची सुरुवाती किंमत 3.99 लाख रुपये एवढी असून टॉप व्हेरियेण्टची किंमत 5.96 लाख रुपये आहे . मारुती सुझुकीच्या अल्टो k 10 मध्ये 1.0 लिटर ड्युअलजेट पेट्रोल इंजिन देण्यात आलेले आहे. हे इंजन 66hp पॉवरवर 89 nm टॉर्क जनरेट करते. यामध्ये 5 स्पीड मॅन्युअल आणि 5 स्पीड एएमटी गिअर बॉक्स देण्यात आले आहे.