Maruti Suzuki Celerio : मारुती सुझुकीने लाँच केलं Celerio चे स्पेशल एडिशन; पहा किंमत किती?

Maruti Suzuki Celerio । प्रसिद्ध ऑटोमोबाईल निर्माता कंपनी Maruti Suzuki ने Celerio चे स्पेशल एडिशन लॉन्च केले आहे कंपनीने फेस्टिवल सिझनच्या माध्यमातून ग्राहकांना नवीन वाहन खरेदी करण्याचा लाभ मिळावा यामुळे हे स्पेशल एडिशन लॉन्च केले आहे. तुम्ही देखील फेस्टिवल सिझनच्या माध्यमातून नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मारुती सुझुकी कंपनीने लॉन्च केलेली ही Celerio खरेदी करण्याचा विचार करू शकता. या नवीन स्पेशल एडिशन सेलेरिओ मध्ये कंपनीने बरेच बदल केले आहेत. ही कार नवीन पद्धतीने डेव्हलप करण्यात आली असून यामध्ये वेगवेगळे फीचर्स उपलब्ध आहे.

   

ॲक्सेसरीज

सेलेरियो स्पेशल एडिशन कारमध्ये व्हिल आर्क क्लेडींग, बॉडी साईड मोल्डिंग, डोर वाईजर गार्निश इन्सर्ट, मल्टीमीडिया स्टेरिओ यासारख्या ॲक्सेसरीज उपलब्ध करण्यात आले आहे. त्याचबरोबर कारमध्ये बूट मॅट, थ्रीडी मॅट, स्टीअरिंग व्हील कव्हर, डोर सील गार्ड, नंबर प्लेट गार्निश हे देखील देण्यात आले आहे. या ॲक्सेसरीजमुळे ही स्पेशल एडिशन कार आणखीन स्टायलिश दिसते. मारुती सेलेरिओ च्या आधीच्या कार पेक्षा या नव्या स्पेशल एडिशनची किंमत 25 हजार रुपये जास्त असू शकते मात्र याबाबत अजून कोणतीच माहिती उपलब्ध करण्यात आलेली नाही

स्पेसिफिकेशन– Maruti Suzuki Celerio

Maruti Suzuki Celerio च्या स्पेशल एडिशन कारमध्ये रिव्हर्स पार्किंग सेन्सर,  EBD , ABS सिस्टीम देण्यात आली आहे. त्याचबरोबर यामध्ये देण्यात आलेल्या इंजिन बद्दल बोलायचं झालं तर यामध्ये 1.0 लिटर, 3 सिलेंडर ड्युअल VVT इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 67 BHP आणि 89 NM पीक टॉर्क जनरेट करते. मारुती सुझुकी कंपनीने या सेलेरिओ स्पेशल एडिशन कार मध्ये CNG व्हेरिएंट देखील उपलब्ध केले आहे.