Maruti Suzuki Hustler लवकरच होणार लाँच; 32 KM पर्यंत मायलेज देणार

टाइम्स मराठी । आज-काल कॉम्पॅक्ट SUV ची भारतीय बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात चलती आहे. त्यातच मारुती सुझुकी या वर्षाच्या अखेरीस Maruti Suzuki Hustler ही आपली युनिक SUV भारतात लॉन्च करणार आहे. तुम्ही सुद्धा अशीच एक स्टाईलिश आणि बोल्ड डिझाईन असलेली SUV कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Maruti Suzuki Hustler तुमच्यासाठी बेस्ट पर्याय ठरेल. आज आपण या गाडीचे खास फीचर्स जाणून घेऊयात.

   

32 किलोमीटर पर्यंत मायलेज –

Maruti Suzuki Hustler या कॉम्पॅक्ट SUV मध्ये तुम्हाला तीन सिलेंडर 660cc इंजिन मिळेल. या इंजिन सोबत CVT ट्रान्समिशन जोडण्यात आले आहे. मारुतीचे हे इंजिन 52 HP पॉवर आणि 63 NM पिक टॉर्क जनरेट करते. Maruti Suzuki Hustler ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही 23 ते 32 किलोमीटर प्रति लिटर एवढे मायलेज देते. त्याचबरोबर ही एसयूव्ही JC08 यावर आधारित असून हे एक इंधन मोजणारे जापानी मानक आहे.

अन्य फीचर्स – Maruti Suzuki Hustler

गाडीच्या फीचर्स बाबत सांगायचं झाल्यास, Maruti Suzuki Hustler या कॉम्पॅक्ट SUV मध्ये सनरूफ, डिजिटल डिस्प्ले, 360 डिग्री कॅमेरा, रियर सेंसर, पावर विंडो, पावर साईड मिरर, AC , ABS , स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, डिजिटल कन्सोल, एअर बॅग यासारखे फीचर्स देण्यात आले आहे. त्याचबरोबर ही SUV बोर्ड डिझाईन मध्ये उपलब्ध असून अप्रतिम ड्रायव्हिंग अनुभव देते.

किती असेल किंमत?

Maruti Suzuki Hustler ही SUV या वर्षाच्या अखेरीस भारतामध्ये लॉन्च करण्यात येणार आहे. कंपनीने ही SUV पाच व्हेरियंट मध्ये उपलब्ध केली आहे. यामध्ये LXi, VXi, Zxi, ZXi + Alpha या व्हेरिएन्टचा समावेश आहे. या गाडीची सुरुवातीची किंमत 6.99 लाख असू शकते तर टॉप व्हेरिएन्टची किंमत 10.49 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते.