Maruti Suzuki ने लाँच केली न्यू जनरेशन Swift; पहा काय फीचर्स मिळणार

टाइम्स मराठी । गेल्या काही दिवसांपासून मारुती सुझुकी कंपनीची नवीन जनरेशन स्वीट लॉन्च होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर ग्राहक या न्यू जनरेशन कारची मोठया प्रमाणात प्रतीक्षा करत होते. आता मारुती सुझुकी ही न्यू जनरेशन स्विफ्ट जपानमध्ये लॉन्च केली आहे. ही स्विफ्ट कंपनीने टोकियो मोटर शोमध्ये प्रदर्शित केली असून लवकरच भारतात लॉन्च होण्याची शक्यता आहे. या न्यू जनरेशन स्विफ्ट मध्ये वेगवेगळे फीचर्स देण्यात येऊ शकतात. यासोबतच ही न्यू जनरेशन मारुती सुझुकी स्विफ्ट पुढच्या वर्षी 2024 मध्ये भारतात लॉन्च करण्यात येईल. आज आपण जाणून घेऊया या कारचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन. 

   

डिझाईन 

न्यू जनरेशन मारुती सुझुकी स्विफ्टमध्ये कंपनीने आधुनिक आणि टेक्निकल अपडेट्स केले आहे. यासोबतच कंपनीने या स्विफ्टच्या फ्रंट आणि रियर साईड मध्ये देखील बरेच बदल केले आहेत. या न्यू जनरेशन मारुती सुझुकी स्विफ्ट च्या इंजिन मध्ये देखील तुम्हाला बरेच बदल जाणून येतील. या स्विफ्ट मध्ये 1197cc , 12 Volve , DOHC इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन सौम्य हायब्रिड टेक्नोलॉजीने सुसज्ज असून 82 BHP पॉवर आणि 108 Nm पीक टॉर्क जनरेट करते.  या स्विफ्ट मध्ये इंजिन सोबतच इलेक्ट्रिक मोटर देखील उपलब्ध करण्यात आली आहे. ही मोटर 3.1 BHP पावर आणि 60 Nm पीक टॉर्क जनरेट करते. यामध्ये हायब्रीड सिस्टम सेल्फ चार्जिंग सुविधा देण्यात आली आहे. जेणेकरून कार सुरू होताच आपोआप चार्ज होण्यास मदत होते. म्हणजेच ग्राहकांना हायब्रीड बॅटरी वेगळी चार्ज करण्याची गरज नाही.

मायलेज 

न्यू जनरेशन मारुती सुझुकी स्विफ्ट मध्ये देण्यात आलेल्या हायब्रिड इंजिनमुळे कारचे मायलेज वाढण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. त्यानुसार ही कार प्रती लिटर 23.4 km एवढे मायलेज देते. आणि हायब्रिड मोटर प्रती लिटर 25 km मायलेज देण्यास सक्षम आहे.

फीचर्स

नवीन जनरेशन मारुती सुझुकी स्विफ्ट च्या डिझाईन बद्दल बोलायचं झालं तर, या स्विफ्ट मध्ये फ्रंट आणि रियर दोन्ही साईडने बदल करण्यात आले आहे. त्यामुळे ही कार पूर्वीपेक्षा जास्त आधुनिक आणि आकर्षक अशी दिसते. या कार मध्ये नवीन फ्रंट ग्रिल, बंपर, बोनेट, ड्युअल टोन अलॉय व्हील, ब्लॅक आऊट ORVM, रुफ देण्यात आले आहे. यासोबतच नवीन डिझाइन केलेले LED टेललाईट, स्किड प्लेट आणि LED DRL, रियर साईडने डिझाइन केलेले टेलगेट यामध्ये देण्यात आले आहे.

या तारखेला होणार भारतात लॉन्च 

नवीन जनरेशन मारुती सुझुकी स्विफ्ट जपानी मॉडेल प्रमाणेच इंजिन आणि फीचर्स सह भारतात लॉन्च करण्यात येणार आहे. याशिवाय भारतात लॉन्च होणाऱ्या स्विफ्टचे ट्यूनिंग बदलण्यात येऊ शकते, जेणेकरून कारच्या पावरमध्ये फरक दिसून येईल. या स्विफ्ट च्या किंमतीबद्दल बोलायचं झालं तर, ही कार 6.5 लाख ते 6.7 लाख रुपयांच्या किंमतीत लॉन्च केली जाऊ शकते.