Maruti च्या ‘या’ Car वर मिळतोय 54000 रुपयांचा डिस्काउंट; 25 KM मायलेज

टाइम्स मराठी । लवकरच फेस्टिवल सिझन सुरू होणार असून ऑटोमोबाईल निर्माता कंपन्यांनी देखील Car खरेदीवर डिस्काउंट ऑफर सुरू केल्या आहेत. त्यानुसार आता नवरात्र आणि दिवाळीसाठी Maruti Suzuki ने मिनी स्पोर्टकारवर बंपर डिस्काउंट ऑफर केला आहे. ही मिनी स्पोर्ट्स कार म्हणजेच  S-Presso ही आहे. तुम्ही देखील दिवाळीला किंवा नवरात्रीमध्ये कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी मारुती सुझुकीची ही कार बेस्ट चॉईस आहे. यासोबतच कंपनीकडून या कारवर 54000 रुपयांपर्यंत डिस्काउंट देण्यात येत आहे. चला तर मग ही ऑफर नेमकी काय आहे ते जाणून घेउयात.

   

काय आहे ऑफर

Maruti Suzuki S- Presso ही प्रचंड आकर्षक अशी कार असून यामध्ये सहा कलर ऑप्शन देण्यात आले आहे. ही कार 4.26 लाख रुपये  एक्स शोरूम किमतीमध्ये उपलब्ध असून या कारच्या टॉप वेरीएंटची किंमत 6.12 लाख रुपये आहे. कंपनीकडून या कारच्या पेट्रोल व्हर्जन वर 30000 कॅश डिस्काउंट आणि 20,000 एक्सचेंज बोनस देण्यात येत आहे. एवढेच नाही तर 4000 रुपये कॉर्पोरेट डिस्काउंट देखील या कार सोबत उपलब्ध करण्यात येत आहे. त्यानुसार ग्राहक ही कार 54 हजार रुपयांच्या डिस्काउंटवर खरेदी करू शकतात. परंतु 31 ऑक्टोबर पर्यंतच तुम्हाला या ऑफरचा लाभ घेता येणार आहे. कंपनीकडून फेस्टिवल सीजन पाहता ही ऑफर देण्यात आली आहे.

इंजिन

Maruti Suzuki S- Presso ही कार पेट्रोल आणि CNG दोन्ही इंजिन ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये 1.0 लिटर  पेट्रोल इंजिन देण्यात आले असून हे इंजन 66 bhp पावर आणि 89 nm पीक टॉर्क जनरेट करते. त्याचबरोबर या कारमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही ट्रान्समिशन उपलब्ध करण्यात आले आहे. मारुती सुझुकीची ही पेट्रोल वर चालणारी कार 25.30 किलोमीटर प्रति लिटर एवढे मायलेज देते.

फीचर्स-

Maruti Suzuki S- Presso मध्ये स्टार्ट आणि स्टॉप बटन, ऍडजेस्टेबल ORVM यासारखे फीचर्स देण्यात आले आहे. यासोबतच स्मार्ट प्ले इम्पोर्टेनमेंट सिस्टीम, माऊंटेड इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, स्पीड अलर्ट , हिल होल्ड असिस्ट, यासारखे ऍडव्हान्स फीचर्स देण्यात आले आहे. हिल होल्ड असिस्ट या फीचरमुळे  कार पहाडावरून किंवा उंचावरून मागे सरकत नाही. या कार मध्ये कंपनीने std, LXi, VXi (0), VXi+ (0) हे चार व्हेरिएंट उपलब्ध केले आहे.