Maruti ने लाँच केली परवडणारी कार; जास्त मायलेज अन् किंमतही कमी

टाइम्स मराठी । कार बनवणारी भारतातील सर्वात मोठी कंपनी म्हणजे मारुती सुझुकी इंडिया. ही कंपनी सतत त्यांच्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये नवीन कार मॉडेल्स लॉन्च करत असते. त्याचप्रमाणे आता कमर्शियल सेगमेंट मध्ये या कंपनीने नवीन कार लॉन्च केली आहे. मारुती सुझुकी हैचबैक टूर एच1 असं या कारचं नाव आहे. ही लेटेस्ट कॉमर्शियल हैचबैक कंपनीच्या आल्टो K10 मॉडल वर आधारित कार असून परवडणाऱ्या किमतीत मिळत आहे. ही कार सिंगल ट्रिम आणि दोन व्हेरियंटसह बाजारात उपलब्ध आहे. आज आपण या कारची वैशिष्ट्ये आणि किमतीबाबत जाणून घेऊया…

   

इंजिन –

Maruti टूर H1 पेट्रोल आणि सीएनजी या दोन प्रकारात येते. या कारमध्ये 1.0L, K-Series, DualJet, Dual VVT नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 5500 rpm वर 65 bhp आणि 3500 rpm वर 89 Nm टॉर्क निर्माण करते. या कारचे CNG मॉडेल फॅक्टरी फिटेड सीएनजी किट सोबतच येते. गाडीच्या मायलेज बद्दल सांगायचं झाल्यास पेट्रोलवर चालणाऱ्या कारचे मायलेज 24.6 किलोमीटर पर लिटर आणि डिझेलवर चालणाऱ्या कारचे मायलेज 3.46 किलोमीटर पर किलोग्राम इतकं आहे.

फीचर्स –

मारुतीची हि हॅचबॅक कार रिअर पार्किंग सेन्सर्स, इंजिन इमोबिलायझर आणि प्रशस्त इंटीरियरसह येते. तसेच ड्रायव्हर सीट आणि प्रवाशांसाठी एअरबॅटी सुरक्षा, ड्युअल एअरबॅग्ज, ABS, EBD, प्री-टेन्शनरसह पुढच्या सीट, सीट बेल्ट अलर्ट यांसारखे फीचर्स देखील देण्यात आलेले आहे. मारुतीच्या या नव्या हॅचबॅक कार मध्ये तुम्हाला मेटॅलिक सिल्की सिल्व्हर, मेटॅलिक ग्रॅनाइट ग्रे आणि आर्क्टिक व्हाइट या तीन रंगांच्या शेडचे पर्याय मिळतील.

किंमत किती –

गाडीच्या किमतीबाबत सांगायचं झाल्यास, मारुती टूर एच वन 1 L, 5MT पेट्रोल मॉडेल कारची एक्स शोरूम किंमत 4.8 लाख रुपये एवढी आहे. त्याचबरोबर सीएनजी मॉडेल असलेल्या कार ची किंमत 5.70 लाख रुपये आहे. मारुती सुझुकी कंपनीकडे सेडान, मल्टी युटिलिटी व्हेईकल, हॅचबॅक त्याचबरोबर सर्व विभागातील कार आहेत. या कार नवीन एन्ट्री लेवल वर असून पुढच्या पिढीच्या पसंतीस उतरतील अशा आहेत.