दिवाळीनिमित्त Maruti च्या ‘या’ कारवर मिळतोय बंपर डिस्काउंट

टाइम्स मराठी । सध्या सर्वत्र दिवाळीची तयारी सुरु असून या पवित्र सणाला वाहन खरेदीकडे लोकांचा मोठ्या प्रमाणात कल दिसून येतो. त्यातच दिवाळी निमित्त काही कंपन्या त्यांच्या प्रॉडक्टवर बम्पर डिस्काउंट ऑफर करत असतात. जेणेकरून ग्राहकांना कमी किमतीमध्ये वस्तू खरेदी करता येतील. तुम्ही देखील यंदा दिवाळीमध्ये कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मारुती सुझुकीची Wagon R ही कार तुमच्यासाठी बेस्ट ठरेल. या कार वर मारुती सुझुकीकडून आकर्षक डिस्काउंट ऑफर करण्यात येत आहे. त्यानुसार तुम्ही अगदी कमी किमतीत ही गाडी घरी घेऊन जाऊ शकता. आज आपण जाणून घेऊया काय आहे ही ऑफर.

   

काय आहे ऑफर

Maruti Suzuki Wagon R या कारवर कंपनीकडून फेस्टिव ऑफर देण्यात येत आहे. त्यानुसार कंपनी ग्राहकांना 50,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट देत आहे. यासोबतच कंपनी या कारवर फायनान्स ऑफर देखील देत आहे. जर तुम्ही ही कार EMI वर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर प्रत्येक महिन्याला भरण्यात येणारा हप्ता हा देखील कमी असणार आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 5.54 लाख ते 7.42 लाख रुपये एवढी असून ही कार मार्केट मध्ये 12 व्हेरिएंट मध्ये उपलब्ध आहे. जाणून घेऊया या कारचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन.

Maruti Suzuki Wagon R या हॅचबॅक कार मध्ये 1.2 लिटर पेट्रोल इंजन देण्यात आले आहे. हे इंजन 90 PS पावर आणि 113  NM पिक टॉर्क जनरेट करते. त्याचबरोबर हे इंजन 5 स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सह उपलब्ध आहे. या CNG व्हर्जन 57 PS पावर आणि 82.1 nm पिक टॉर्क जनरेट करते. गाडीच्या मायलेज बद्दल सांगायचं झाल्यास या कारचे पेट्रोल इंजन  25.19 किलोमीटर प्रति लिटर एवढे मायलेज देते. आणि CNG व्हर्जन कार 34.05 किलोमीटर प्रती किलोग्राम एवढे मायलेज देते.

फिचर्स

Maruti Suzuki Wagon R या हॅचबॅक कार मध्ये 7 इंच चा टच स्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच चार स्पीकर म्युझिक सिस्टीम, स्टेअरिंग माउंटेड ऑडिओ, फोन कंट्रोल यासारखे फीचर्स देण्यात आले आहे. एवढेच नाही तर कार मध्ये ड्युअल फ्रंट एअर बॅग, ईबिडी सह ABS , रियर पार्किंग सेंसर, हिल होल्ड असिस्ट यासारखे  सेफ्टी फीचर्स देखील देण्यात आले आहे.

Maruti Suzuki Wagon R ही कार भारतीय बाजारपेठेमध्ये उपलब्ध असलेल्या Maruti Celerio, TATA TIAGO, CITROAEN C3 या कार सोबत प्रतिस्पर्धा करते. या हॅचबॅक कारमध्ये 2 ड्युअल टोन कलर आणि 6 मोनो टोन कलर ऑप्शन देण्यात आले आहे. त्याचबरोबर 341 लिटर बूट स्पेस देखील या कारमध्ये मिळतो.