न्यू जनरेशन Maruti Swift 2024 मध्ये होईल लॉन्च; जाणून घ्या काय असेल खास

टाइम्स मराठी । मारुती स्विफ्ट ही भारतीय ऑटोमोबाईल कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Maruti Suzuki कंपनीने डेव्हलप केलेली हॅचबॅक कार आहे. Maruti Swift ही भारतातील लोकप्रिय म्हणून ओळखली जाते. मारुती स्विफ्ट या हॅशबॅक कारचे आठ वर्जन उपलब्ध करण्यात आले आहेत. हे आठही वर्जन वेगवेगळ्या वैशिष्ट्यांसहित उपलब्ध असून ही एक स्टायलिश डिझाईन केलेली कार आहे. आता ही हॅचबॅक कारच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. मारुती सुझुकी कंपनीने या स्विफ्टचे नवीन अवतारामध्ये अनावरण केले आहे.

   

Maruti Suzuki ने जापान मोबिलिटी शो 2023 मध्ये  स्विफ्ट ही नवीन अवतारात लॉन्च केली आहे. ही स्विफ्ट हॅचबॅक कार न्यू जनरेशन मॉडेल मध्ये लॉन्च करण्यात आली. संपूर्ण जगभरात या न्यू जनरेशन स्विफ्ट ची चर्चा रंगली होती. आता लवकरच ही अपडेटेड स्विफ्ट भारतात लॉन्च होऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार ही कार 2024 मध्ये लॉन्च करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या न्यू जनरेशन स्विफ्ट मध्ये बरेच ऍडव्हान्स फीचर्स उपलब्ध करण्यात आले आहे.

पावरट्रेन

न्यू जनरेशन स्विफ्ट मध्ये 1.2 लिटर, 3 सिलेंडर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. यामध्ये स्ट्रॉंग हायब्रीड टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. यासोबतच नेक जनरेशन स्विफ्ट कार चे मायलेज 35 ते 40 किलोमीटर प्रति लिटर एवढे असू शकते.ही कार पूर्णपणे डेव्हलप करण्यात आली असून कारचा एक्स्टर्नल आणि इंटरनल भागामध्ये देखील बदल जाणवतात.

ADAS सिस्टीम

या न्यू जनरेशन स्विफ्ट मध्ये स्लीकर LED हेडलाईट, L शेप DRL , क्लॅमशेल बोन, नवीन ग्रील, फॉग लॅम्प, सी शेप टेललाईट, ड्युअल टोन अलॉय व्हील  यासोबतच सेफ्टीसाठी 6 एअर बॅग, ABS, ADAS, EBD हे फीचर्स देण्यात आले आहे. या कारच्या अपहोस्ट्री बद्दल बोलायचं झालं तर, कार मध्ये अपहोस्ट्री पूर्णपणे बदलून लेदर टच देण्यात आला आहे.

फिचर्स

या नवीन स्विफ्टच्या इंटेरियर बद्दल बोलायचं झालं तर, इंटेरियर अप्रतिम डिझाईन करण्यात आले आहे. या नवीन स्विफ्ट मध्ये तुम्हाला अपडेटेड सेंटर कन्सोल, डॅशबोर्ड, मल्टी फंक्शनल फ्लॅट बॉटम स्टेअरिंग व्हिल देण्यात आले आहेत. त्याचबरोबर यात 9 इंचची फ्लोटिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि एप्पल कार प्ले, नवीन एसी वेंट्स, पुश स्टार्ट स्टॉप बटन, सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर यासारखे स्टॅंडर्ड फीचर्स देण्यात आले आहे. या नवीन कार मध्ये एयर कंडीशन चेंज करून क्लायमेट कंट्रोल उपलब्ध करण्यात आले आहे.

किंमत

न्यू जनरेशन स्विफ्ट मध्ये हायब्रीड पॉवरट्रेन उपलब्ध करण्यात आली आहे. यासोबतच 360 डिग्री कॅमेरा, ADAS यासारखे ऍडव्हान्स फीचर्स देखील देण्यात आले आहे. सध्या तरी या नवीन स्विफ्टच्या किमतींबद्दल कंपनीने माहिती दिलेली नाही. परंतु जुन्या मॉडेल पेक्षा जास्त किमतीमध्ये ही कार उपलब्ध होऊ शकते. सध्या भारतामध्ये उपलब्ध असलेल्या स्विफ्टच्या बेस व्हेरिएंटची किंमत 5.99 लाख रुपये आहे. आणि टॉप व्हेरिएंट ची किंमत 9.03 लाख रुपये आहे.