दिवाळीला गाडी खरेदी करायची आहे? मारुतीची ‘ही’ कार ठरेल बेस्ट पर्याय; 34 KM मायलेज

टाइम्स मराठी । Maruti Suzuki कंपनी ही हाय मायलेज देणाऱ्या आणिपरवडणाऱ्या किमतीमध्ये कार उपलब्ध करणारी कंपनी म्हणून ओळखली जाते. त्यातच मारुती सुझुकीची Maruti Wagon R ही कार दमदार मायलेज आणि फीचर्ससह ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. सध्या भारतात सणासुदीचा काळ सुरु आहे. या पार्श्वभूमीवर येत्या दसऱ्याला किंवा दिवाळीला तुम्ही नवी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Maruti Wagon R तुमच्यासाठी बेस्ट पर्याय ठरू शकते. आज आपण या गाडीचे खास फीचर्स आणि तिच्या किमतीबाबत जाणून घेऊयात.

   

Maruti Wagon R ही हॅचबॅक कार LXi, VXi, ZXi, ZXi plus या चार व्हेरिएंट मध्ये उपलब्ध आहे. त्यापैकी LXi, VXi हे दोन व्हेरियंट CNG वर्जन मध्ये लॉन्च करण्यात आली आहे. सध्या कंपनी Maruti Wagon R च्या इलेक्ट्रिक व्हर्जन वर काम करत आहे. Maruti Wagon R ची किंमत भारतीय बाजारपेठेमध्ये 5.55 लाख रुपये एवढी आहे. आणि या कारच्या टॉप मॉडेल ची किंमत 7.43 लाख रुपये आहे.

स्पेसिफिकेशन

Maruti Wagon R या हॅचबॅक कार मध्ये 1.2 लिटर पेट्रोल इंजन ऑप्शन देण्यात आले आहे. हे इंजन 90 PS पवार आणि 113 NM पिक टॉर्क जनरेट करते. त्याचबरोबर हे इंजन पाच स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सह उपलब्ध आहे. Maruti Wagon R चे CNG व्हर्जन 57 PS पॉवर आणि 82.1 nm पिक टॉर्क जनरेट करते. हे पेट्रोल इंजन 25.19 किलोमीटर प्रति लिटर एवढे मायलेज देते. आणि CNG व्हर्जन कार 34.05 किलोमीटर प्रती किलोग्राम एवढे मायलेज देते.

फिचर्स

Maruti Wagon R मध्ये 7 इंचचा टच स्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच चार स्पीकर म्युझिक सिस्टीम, स्टेअरिंग माउंटेड ऑडिओ, फोन कंट्रोल यासारखे फीचर्स देण्यात आले आहे. एवढेच नाही तर कार मध्ये ड्युअल फ्रंट एअर बॅग, ईबिडी सह एबीएस, रियर पार्किंग सेंसर, हिल होल्ड असिस्ट यासारखे सेफ्टी फीचर्स देखील देण्यात आले आहे.

कलर ऑप्शन

Maruti Wagon R ही कार भारतीय बाजारपेठेमध्ये उपलब्ध असलेल्या MARUTI CELERIO, TATA TIAGO, CITROAEN C3 या कार सोबत प्रतिस्पर्धा करते. या हॅचबॅक कारमध्ये 2 ड्युअल टोन कलर आणि 6 मोनो टोन कलर ऑप्शन देण्यात आले आहे. त्याचबरोबर 341 लिटर बूट स्पेस देखील या कारमध्ये मिळतो.