Max Pro Epic आणि Max Pro Grand स्मार्टवॉच लॉन्च; पहा किंमत आणि फीचर्स

टाइम्स मराठी । काही वर्षांपासून स्मार्टवॉच खरेदी करण्याकडे भारतीय ग्राहकांचा मोठा कल दिसून येतो. भारतीय बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या कंपनीच्या  धमाकेदार फीचर सह बऱ्याच स्मार्टवॉच उपलब्ध आहे. स्मार्टवॉच सेगमेंट मध्ये टिकून राहण्यासाठी बऱ्याच कंपन्या स्मार्टवॉच मध्ये नवीन फीचर्स आणि नाविन्यता आणण्याचा प्रयत्न करतात. जेणेकरून स्मार्टवॉच ग्राहकांना पसंत पडेल. त्यानुसार आता वॉच निर्माता कंपनी मॅक्सीमाने नवीन दोन स्मार्टवॉच लॉन्च केल्या आहे. या स्मार्टवॉचचे नाव Max Pro Epic आणि Max Pro Grand आहे. मॅक्सीमा कंपनीचे दोन्ही प्रोडक्ट मेड इन इंडिया असून वेगवेगळ्या कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे. जाणून घेऊया या स्मार्टवॉचचे फीचर आणि स्पेसिफिकेशन.

   

किंमत

Max Pro Epic आणि Max Pro Grand या दोन्ही स्मार्टवॉच च्या किमती जाणून घेऊया, Max Pro Epic या स्मार्टवॉच ची किंमत 1,399 रुपये ठेवण्यात आली आहे. हे स्मार्टवॉच दोन कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे. त्यानुसार यामध्ये क्रीम आणि क्लासिक ब्लॅक कलर मिळतात. तुम्ही हे स्मार्टवॉच फ्लिपकार्ट वर खरेदी करू शकता. Max Pro Grand हे स्मार्टवॉच 1,299 किमतीमध्ये उपलब्ध आहे. तुम्ही ही स्मार्टवॉच अमेझॉन वर खरेदी करू शकता. या स्मार्टवॉच मध्ये ब्लॅक, पिंक, रोज गोल्ड ब्लॅक, रोज गोल्ड पिच, आणि सिल्वर ग्रे कलर ऑप्शन उपलब्ध आहे.

स्पेसिफिकेशन

Max Pro Epic या स्मार्टवॉच मध्ये 1.85 इंच चा HD 2.5 D कर्व्ह डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 240×286 पिक्सल रिझोल्युशन ऑफर करतो. आणि Max Pro Grand या स्मार्टवॉच मध्ये 1.83 इंच HD 2.5 D कर्व्ह डिस्प्ले  देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 240×286 रिझोल्युशन ऑफर करतो. या दोन्ही स्मार्टवॉच  मॅक्सीमा स्मार्ट फिट ॲप वर काम करतात.

फीचर्स

Max Pro Epic या स्मार्टवॉच मध्ये क्लाऊड वेस्ट वॉच फेसेस देण्यात आले आहे. ज्यामुळे हे स्मार्टवॉच जास्त पर्सनलाईज्ड वाटते. Max Pro Epic आणि Max Pro Grand दोन्ही स्मार्टवॉच मध्ये कनेक्टिव्हिटी साठी ब्लूटूथ वर्जन 5.0 सपोर्ट उपलब्ध आहे. यासोबतच दोन्ही स्मार्टवॉचला IP67 सर्टिफिकेशन देण्यात आले आहे. म्हणजेच तुम्ही हे स्मार्टवॉच धूळ पाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये वापरू शकतात.

गुगल असिस्टंट सपोर्ट

Max Pro Epic आणि Max Pro Grand या दोन्ही स्मार्टवॉच मध्ये कॅलेंडर सेंडेटरी आणि ड्रिंकिंग रिमाइंडर, स्टॉप वॉच, टाईमर, स्क्रीन लॉक यासारखे बरेच फीचर्स उपलब्ध आहे. मॅक्सीमा कंपनीने दोन्ही स्मार्टवॉच अँड्रॉइड आणि IOS दोन्ही डिव्हाइस साठी उपलब्ध केले आहे. यासोबतच दोन्हींसाठी गुगल असिस्टंट आणि व्हॉइस असिस्टंट सपोर्ट उपलब्ध आहे.