Media Tek ने लॉन्च केला Dimensity 8300 Processor; मिळेल 3 पट अप्रतिम AI परफॉर्मन्स

टाइम्स मराठी | तैवान फॅबलेस सेमीकंडक्टर कंपनी mediatech फ्लॅगशिप स्मार्टफोन चिपसेट लॉन्च करत असते. आता काही दिवसांपूर्वी मीडियाटेकने Dimensity 9300 प्रोसेसर लॉन्च केला होते. आता कंपनीने भारतीय बाजारपेठेत  Dimensity 8300 चीपसेट लॉन्च केला आहे. कंपनीने जनरेटर AI फीचर, पावर एफिशियन्सी आणि कनेक्टिव्हिटी या तिन्ही गोष्टीवर लक्ष देत 5G स्मार्टफोन साठी हा चिपसेट लॉन्च केला.

   

CPU

Dimensity 8300 हा चिपसेट जुन्या चिपसेटच्या तुलनेत 20 टक्के अप्रतिम परफॉर्मन्स ऑफर करते. यासोबतच  30% विजेची बचत करते. Dimensity 8300 TSMC च्या सेकंड जनरेशन 4nm प्रक्रियेवर आधारित आहे. यामध्ये ऑक्टा कोर CPU  देण्यात आले आहे. यात कंपनीने आर्म V9 CPU आर्किटेक्चर वर डेव्हलप केलेले 4 आर्म कॉर्टेक्स A715 कोर आणि चार कोर्टेक्स  A510 कोर देण्यात आले आहे. हे CPU  mali G 615 MC6 GPU सह सुसज्ज आहे.

AI परफॉर्मन्स

Dimensity 8300 मध्ये जनरेटिव्ह AI सपोर्ट मिळतो. म्हणजेच हे APU 780 AI प्रोसेसरने सुसज्ज आहे. हे चिपसेट डेव्हलपर्स ला इनोवेटिंग एप्लीकेशन बनवण्यासाठी मदत करेल. या चिपसेटच्या माध्यमातून भाषा मॉडेल  LLM चा लाभ घेता येऊ शकतो. APU 780 मध्ये फ्लॅटशिप डायमेन्शन  9300 चिपसेट प्रमाणे आर्किटेक्चर आहे. ज्यामुळे  INT आणि FP16 गणनेत 2 पट सुधारणा होते. Dimensity 8300 या चिपसेटमध्ये Dimensity 8200 च्या तुलनेत एआय परफॉर्मन्स 3.3% वाढवण्यात आला आहे.

कॅमेरा

Dimensity 8300 या चिप्स सेटमध्ये वाय-फाय, ब्लूटूथ सपोर्ट सह GPS आधारित नेवीगेशन साठी GPE, ग्लोनास  NavlC सपोर्ट देण्यात आला आहे. या चिपसेटमध्ये 320 MP कॅमेरा, 5.17 Gbps पर्यंत 5G नेटवर्क डाउन लिंक स्पीड  मिळते.   Dimensity 8300 हे चिपसेट क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 Gen 2, स्नॅपड्रॅगन 8 Gen 1 चीपसेटला टक्कर देते.