मीडियाटेक ने लॉन्च केला Dimensity 9300 प्रोसेसर 

टाइम्स मराठी । तैवानची फॅबलेस सेमीकंडक्टर कंपनी म्हणून ओळखल्या जाणारी मीडियाटेक कंपनी प्रत्येक वर्षी नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन चिपसेट लॉन्च करत असते. त्यानुसार यंदा मीडियाटेक कंपनीने Dimensity 9300 प्रोसेसर लॉन्च केला आहे. यासोबतच  मार्केटमध्ये Qwalcomm चे Snapdragon 8 Gen 3 हे प्रोसेसर देखील उपलब्ध आहे. नवीन लॉन्च करण्यात आलेला Dimensity 9300 प्रोसेसर स्नॅपड्रॅगनला टक्कर देईल. कंपनीने लॉन्च केलेला हा प्रोसेसर मागच्या वर्षी लॉन्च करण्यात आलेल्या Dimensity 9200 आणि Dimensity 9200+ या प्रोसेसरचे अग्रेडेड मोबाईल प्लॅटफॉर्म आहे.

   

Dimensity 9300 हा न्यूली लॉन्चिंग प्रोसेसर TSMC 4nm थर्ड जनरेशन प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी वर काम करतो. Dimensity 9200 आणि Dimensity 9200+ या प्रोसेसर पेक्षाही हा नवीन प्रोसेसर15 ते 40 टक्के अप्रतिम काम करेल. आता बरेच अपकमिंग स्मार्टफोन या नवीन प्रोसेसरसह मिड प्रीमियम सेगमेंटमध्ये लॉन्च होऊ शकतात. या प्रोसेसर मध्ये इंटिग्रेटेड एक्स्ट्रा रेंज टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे.

320 MP कॅमेरा सपोर्ट

Dimensity 9300 या प्रोसेसर मध्ये Cortex X4 Core वर 3.25 Ghz क्लॉक स्पीड मिळते. सिंगल आणि मल्टीकोर प्रोसेसिंग मध्ये 15 ते 40%  इम्प्रूमेंट करण्यात आली आहे. हा प्रोसेसर कंपनीने गेम डेव्हलपर्स यांना गृहीत धरून डेव्हलप केले आहे. जेणेकरून गेमर्सला गेमिंग वेळी अप्रतिम व्हिज्युअल  एक्सपिरीयन्स मिळेल. यासोबतच या प्रोसेसरमध्ये 320 MP कॅमेरा सपोर्ट उपलब्ध आहे. याशिवाय  HDR व्हिडिओ रेकॉर्डिंग फीचर 60fps वर मिळते.

आर्टिफिशियल इंटेलिजंट प्रोसेसिंग पावर सपोर्ट

Dimensity 9300 या प्रोसेसर सोबत G720 GPU देण्यात आले आहे. हे मागच्या मॉडेल पेक्षा 46% जास्त हार्डवेअर परफॉर्मन्स प्रदान करते. यामध्ये स्पेशल रे ट्रेसिंग इंजिन देण्यात आले आहे. यासोबतच व्हेरिएबल रेट वर रेंडरिंग टेक्नॉलॉजी यामध्ये उपलब्ध आहे. त्याचबरोबर यामध्ये  APU 790 देखील देण्यात आले आहे. हे आर्टिफिशियल इंटेलिजंट (AI ) प्रोसेसिंग पावर ला सपोर्ट करते. यामध्ये WQHD रिझोल्युशन 180 hz आणि 4K रिझोल्युशन  130 hz सपोर्ट करण्याची क्षमता आहे.

फिचर्स

Dimensity 9300 या प्रोसेसर मध्ये  वायफाय, sub 6GHz, mmWave, 5G, 4X4 MIMO आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी यासारखे फीचर्स देण्यात आले आहे. लवकरच लॉन्च होणाऱ्या विवो च्या नवीन X100 सिरीज मध्ये  या नवीन प्रोसेसर चा वापर करण्यात येणार आहे. या प्रोसेसर सोबत  LPDDR5T रॅम आणि UFS 4 स्टोरेज टेक्नॉलॉजी सपोर्ट मिळतो.