5.7 इंच डिस्प्ले असलेला Mini PC लॉन्च; एवढ्या किमतीत उपलब्ध

टाइम्स मराठी । आजकाल लॅपटॉप 14 इंच किंवा त्याहीपेक्षा मोठ्या स्क्रीन डिस्प्ले मध्ये मिळतात. हे मोठा डिस्प्ले असलेले लॅपटॉप प्रवास करताना वापरणे आणि प्रवासात सोबत बाळवताना प्रचंड गैरसोय होते. परंतु आता ही गैरसोय टाळण्यासाठी मिनी कम्प्युटर लॉन्च करण्यात आले आहे. या मिनी कॉम्प्युटरचे नाव Meenhong JX2 आहे. हा Mini PC मोबाईलच्या चार्जर ने देखील पावर करता येतो. हा मोबाईलच्या साईज मध्ये उपलब्ध असलेल्या Mini PC असून हा पीसी ऍक्टिव्हली कूल असल्यामुळे जास्त गरम होत नाही. जाणून घेऊया या Mini PC चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

   

स्पेसिफिकेशन

Meenhong JX2 या पॉकेट साईज Mini PCमध्ये 5.7 इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे. हा डिस्प्ले 1920×1080 पिक्सल रिझोल्युशन ऑफर करतो. या नवीन पीसी मध्ये इंटेल सिलिकॉन N5105 प्रोसेसर वापरण्यात आले आहे. या मिनी पीसी मध्ये कंपनीने दोन स्टोरेज व्हेरिएंट उपलब्ध केले आहे. त्यानुसार यामध्ये 8GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज आणि 8GB रॅम आणि 256 GB इंटरनल स्टोरेज असे दोन व्हेरिएंट देण्यात आले आहे.

फीचर्स

Meenhong JX2 या मिनी पीसीला 30W एवढी पावर गरजेची आहे. यासोबतच हा पीसी 12 वोल्ट इनपुटला सपोर्ट करतो. म्हणजेच तुम्ही हा मिनी पीसी कोणत्याही मोबाईलचा चार्जर ने चार्ज करू शकतात. या मिनी पीसी मध्ये  2 M22280 स्लॉट देण्यात आले आहे. त्यातील एक  स्लॉट SATA ला सपोर्ट करतो. आणि दुसरा NVMe, SATA SSD ला सपोर्ट करतो.

किंमत किती

Meenhong JX2 या पीसी मध्ये HDMI 2.0 इंटरफेस, गिगाबीट इथरनेट, 3 USB A Port, 2 USB C PORT,  1 USB C PORT,  हेडफोन जॅक, ब्लूटूथ वाय-फाय यासारखे कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आले आहे. या मिनी पीसी च्या किमती बद्दल बोलायचं झालं तर, या मिनी पीसी च्या बेस मॉडेल ची किंमत 194 डॉलर्स म्हणजे 16,250 रुपये एवढी आहे. आणि जास्त स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 209 डॉलर्स म्हणजे 17,490 रुपये आहे.