आता पुरुषांनाही मुलाच्या संगोपनासाठी मिळणार 730 दिवसांची रजा

टाइम्स मराठी । महिला कर्मचाऱ्यांना बाल संगोपनासाठी (Child Care) एक खास रजा दिली जाते. त्याचप्रमाणे पुरुष कर्मचाऱ्यांना ( Men Employees) देखील मुलाच्या जन्मानंतर किंवा मूल दत्तक घेतल्यानंतर बाल संगोपनासाठी रजा घेणे आवश्यक आहे. पुरुष कर्मचाऱ्यांना रजा मिळाल्यामुळे महिला किंवा आईवर पडणारा भार कमी होऊ शकेल. याबद्दल 9ऑगस्ट रोजी केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत माहिती दिली. यामुळे आता बाल संगोपनासाठी फक्त महिलेलाच नाही तर पुरुषांना देखील रजा देण्यात येणार आहे.

   

आतापर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांपैकी महिला कर्मचाऱ्यांना बाल संगोपनासाठी रजा देण्याची तरतूद आहे. या काळामध्ये मुलांची काळजी घेण्यासाठी 730 दिवस रजा महिला कर्मचाऱ्यांना मिळते. परंतु महिलेवर मोठ्या प्रमाणात भार पडताना दिसून येतो. त्याचबरोबर एकटा पुरुष जर बाळाचे संगोपन करत असल्यास त्याला महिलेप्रमाणे बालसंगोपन रजा मिळत नाही. यामुळे मोठ्या प्रमाणात लोड व्यक्तींवर येत असतो. या सर्वांचा विचार करून आता केंद्र सरकारने खास घोषणा केली आहे. त्यानुसार केंद्रीय कार्मिक मंत्री जितेंद्र सिंह यांनी एकट्या पुरुषाला 730 दिवसांची रजा देण्यात येणार असल्याचं सांगितलं.

अठरा वर्षापर्यंतच्या दोन मोठ्या मुलांच्या काळजीसाठी नोकरी दरम्यान 730 दिवसांपर्यंतची रजा मंजूर करण्याची तरतूद आहे. हा आकडा नॉर्मल मुलांसाठी असून दिव्यांग मुलांच्या बाबतीत वयोमर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही. असं जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत दिलेल्या लेखी उत्तरांमध्ये म्हटले आहे. एवढेच नाही तर केंद्रीय नागरी सेवा नियम म्हणजेच रजा नियम अंतर्गत 1972 च्या नियमानुसार 43-C नुसार महिला सरकारी नोकरदार आणि केंद्रीय नागरी सेवा, पदावर नियुक्त केलेल्या एकल पुरुष सरकारी सेवक बाल संगोपन रजेसाठी पात्र आहेत. असं देखील केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितलं.

त्याचबरोबर पुरुष कर्मचाऱ्यांना मुलाच्या जन्मानंतर किंवा मूल दत्त घेतल्यानंतर सहा महिन्यांपूर्वी पंधरा दिवसांची रजा मिळण्याचा अधिकार असून वेगवेगळ्या देशांमध्ये ही रजा दिली जाते. स्पेन मध्ये मुलाच्या जन्मानंतर 16 आठवड्यांची पि्तृत्व रजा दिली जाते. स्वीडन मध्ये ही रजा तीन महिन्यांसाठी राखीव ठेवण्यात आलेली असून युरोपीय देशांमध्ये प्रत्येक पालकाला 164 दिवसांची पीतुत्व रजा मिळते. या अगोदर 2022 मध्ये महिला पॅनलने बाळाच्या जन्मानंतर महिलेवरील ओझं कमी व्हावं यासाठी पितृत्व रजा वाढवण्याची विनंती केली होती.