Mercedes AMG C43 4MATIC : Mercedes ने लाँच केली आकर्षक गाडी; पहा किंमत आणि फीचर्स

टाइम्स मराठी । नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच लक्झरी वाहनांसाठी फेमस असलेल्या Mercedes ने भारतीय बाजारपेठेत नवीन कार लॉन्च केली आहे. Mercedes AMG C43 4MATIC असे या गाडीचे नाव असून कंपनीने यामध्ये बऱ्याच अपडेटसह अप्रतिम फीचर्स उपलब्ध केले आहेत. ही न्यू जनरेशन कार कंपनीने 98 लाख रुपयांच्या किमतीत लॉन्च केली आहे. ही कार 4.6 सेकंदात 0 ते 100 किलोमीटर प्रति तास स्पीड पकडते.

   

एक्स्टिरियर

Mercedes AMG C43 4MATIC या कारच्या समोरील बाजूला वीन पॅन अमेरिकन ग्रील उपलब्ध आहे.या सोबतच अडॅप्टीव्ह हेडलाईट, एयर इंटेक ब्लॅक विंग मिरर देखील यामध्ये तुम्हाला मिळेल. दुसरीकडे कारच्या पाठीमागील बाजूला डीफ्युजर आणि क्वाड एक्झॉस्ट टिप्स देण्यात आले आहेत. याशिवाय अपडेटेड फ्रंट एक्सेल, हेविली मॉडिफाइड चेसिस आणि AMG राईड कंट्रोल सस्पेन्शन  यांसारख्या फीचर्सने ही कार सुसज्ज आहे.

फिचर्स– Mercedes AMG C43 4MATIC

Mercedes AMG C43 4MATIC या कार मध्ये 11.9 इंच टच स्क्रीन सिस्टीम, AMG थीम असलेले इंटेरियर देण्यात आले आहे. यासोबतच कार मध्ये 12.3 इंच इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, लेदर रॅप स्टिअरिंग व्हील, रेड सीट बेल्ट, 15 स्पीकर असलेले Burmester सिस्टीम देण्यात आली आहे. या कारमध्ये ब्रेकिंग साठी 4 पिस्टन कॅलिपर्स सह 370 mm स्टील डिस्क, रियर मध्ये  सिंगल पिस्टन फ्लोटिंग कॅलिपर्स  सह 320mm स्टील डिस्क वापरण्यात आले आहे.

स्पेसिफिकेशन

Mercedes AMG C43 4MATIC या कार मध्ये कंपनीने अपडेटेड इंजिन  दिले आहे. यामध्ये लॉन्गिट्यूडिनल माउंटेड 2.0 लिटर 4 सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. यामध्ये इलेक्ट्रिक टर्बोचार्जर देखील उपलब्ध आहे. हे इंजिन 9 स्पीड गिअरबॉक्स सह जोडण्यात आले असून 402 BHP पावर आणि  500nm पिक टॉर्क जनरेट करते. खास गोष्ट म्हणजे ही कार अवघ्या 4.6 सेकंदात 0 ते 100 किलोमीटर प्रति तास स्पीड पकडते.