समुद्रकिनारी सापडला जलपरीचा सांगाडा? फोटो पाहून बघा तुम्हाला काय वाटत?

टाइम्स मराठी । ऑस्ट्रेलियाच्या समुद्र किनाऱ्यावर एका रहस्यमय प्राण्याचे अवशेष सापडल्याने चर्चाना उधाण आलं आहे. या सांगाड्याची कवटी हुबेहुब माणसासारखी होती, तर बाकीचे शरीर जलपरीच्या सांगाड्यासारखे दिसत होते. बॉबी-ली ओट्स नावाच्या एका नागरिकाला समुद्रकिनारी फिरत असताना त्याचा पाय या अवशेषाच्या कवटीला धडकला आणि त्याचे लक्ष्य गेले.

   

बॉबी-ली ओट्स यानंतर सांगितलं कि समुद्रकिनारी आम्ही कॅम्पिंगसाठी जागा शोधत होतो त्यावेळी आम्हाला हा सांगाडा दिसला. सर्वप्रथम सांगाडा पाहताच त्याची कवठी हि मानवासारखी दिसत होती, परंतु जस आम्ही खाली खाली बघत गेलो तस अवशेषाचा बाकीचा भाग आम्हाला एखाद्या जलपरीसारखा दिसला.या सांगाड्याची हाडे लांबलचक होती. सांगाड्यावरील केसाचा थोडा भाग दिसत होता, पण बऱ्याच ठिकाणी केस गायब झाली होती. सांगाड्यामध्ये शेपटीसारखे काहीतरी दिसत आहे.

बॉबी-ली ओट्स यांनी या सांगाड्याचा फोटो लगेच त्यांच्या फेसबुकवर शेअर केला आणि त्याची ओळख पटवण्यासाठी लोकांची मदत घेतली. यानंतर एका व्यक्तीने फोटोवर कमेंट करत तुम्ही एका जलपरीचा सांगाडा पकडला असं म्हंटल तर दुसऱ्या एका यूजर्सने सुद्धा याला दुजोरा दिला आहे. बर्‍याच लोकांचा असा विश्वास आहे की ती जलपरी आहे. परंतु अजूनही काही लोक या सांगाड्याच्या सत्यतेबद्दल साशंक आहेत