आता Whatsapp, Instagram चा आनंद मिळणार दुप्पट; मेटाने आणलं पहिले Generative AI Product

टाइम्स मराठी । मेटा आजकाल युजर साठी वेगवेगळे फीचर्स आणि अपडेट लॉन्च करत आहे. मेटा Whatsappमध्ये सध्या वेगवेगळे फीचर्स आणत आहे. यामुळे Whatsappवापरणे आणखीनच शानदार झाले आहे. त्याचबरोबर आजकाल आर्टिफिशियल इंटेलिजंट चा वापर प्रत्येक एप्लीकेशन मध्ये करण्यात येत आहे. एवढेच नाही तर गुगलमध्ये देखील आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापर करण्यात येत आहे. अशातच आता मेटा कंपनी देखील आर्टिफिशियल इंटेलिजंट प्रॉडक्ट लॉन्च करणार आहे. आणि हे प्रॉडक्ट Instagram Whatsappआणि Facebook मध्ये देखील वापरण्यात येणार आहे.

   

Meta connect 2023 या इव्हेंट मध्ये मेटा कंपनीने आर्टिफिशल इंटेलिजंट प्रॉडक्ट बद्दल माहिती दिली. हा इव्हेंट कॅलिफोर्निया येथील मेनलो पार्क मध्ये मेटाच्या मेन ऑफिसमध्येआयोजित करण्यात आला होता. या प्रोग्राममध्ये AI प्रॉडक्टबद्दल घोषणा करण्यात आल्या. त्याचबरोबर मेटाने यावेळी Generative AI Products लॉन्च केले. हे एक वेळ चॅटबोट असणार आहे. यामध्ये एक लामा 2 लार्ज लैंग्वेज मॉडेल वर बेस्ड असलेले कस्टम मॉडेल वापरण्यात आले आहे.

मेटाने लॉन्च केलेले AI प्रॉडक्ट हे फोटो रिअलस्टिक इमेज आणि चॅटबॉट टेक्स्ट रिएक्शन हे दोन्ही AI पावर ने जनरेट करता येतात. या AI प्रोडक्टमुळे युजर्स ला वेगवेगळे काम करण्यास मदत होते. यामध्ये प्रश्नांची उत्तरे देणे, टेक्स्ट तयार करणे, ट्रान्सलेशन करणे यासारखे काम हे AI प्रोडक्ट करेल. मेटा लवकरच हे प्रॉडक्ट इंस्टाग्राम, व्हाट्सअँप, फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म साठी उपलब्ध करणार आहे.