टाइम्स मराठी | आज-काल सोशल मीडियावर लाखो युजर सक्रिय असतात. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फेसबुक आणि इंस्टाग्राम या प्लॅटफॉर्मचा वापर देखील आज-काल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्याचप्रकारे मेटा कंपनीकडून या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वेगवेगळे फीचर्स उपलब्ध करण्यात येतात. या फीचरच्या माध्यमातून युजर्स ला अप्रतिम अनुभव मिळतो. आता मेटा कंपनीने फेसबुक आणि इंस्टाग्राम दोन्ही प्लॅटफॉर्म साठी नवीन AI टूल लॉन्च केले आहे. या नवीन टूल च्या माध्यमातून युजर्स ला व्हिडिओ आणि रिल्स क्रिएटिव बनवण्यासाठी मदत होईल.
काय आहे हे फीचर
मेटाने लॉन्च केलेले दोन AI टूल्स हे फेसबुक आणि इंस्टाग्राम वर व्हिडिओ एडिट करण्यासाठी डेव्हलप करण्यात आले आहे. AI व्हिडिओ एडिटिंग ॲपच्या माध्यमातून पूर्वीपेक्षा जास्त अट्रॅक्टीव्ह रिल्स आणि व्हिडिओज बनवण्यास मजा येईल. आणि हे व्हिडिओ एडिट करण्यासाठी जास्त वेळ देखील जाणार नाही. मेटाने लॉन्च केलेल्या या दोन AI टूल चे नाव EMU Edit आणि EMU Video आहे. नावानुसार या फीचरच्या माध्यमातून एडिटिंग करणे सोपे होईल.
EMU Edit
मेटाने लॉन्च केलेले पहिले AI टूल EMU EDIT हे आहे. हे एक इमेज एडिटर टूल आहे. याच्या मदतीने युजर सोप्या पद्धतीने फोटोज एडिट करू शकतात. एवढेच नाही तर या फीचरच्या माध्यमातून युजेस ला टेक्स्ट इनपुट आधारे कोणताही फोटोज मधील बॅकग्राऊंड रिमूव्ह करता येते. कलरिंग, आकार बदलणे यासारखे बरेच काम तुम्ही या फीचरच्या माध्यमातून करू शकतात. या AI मॉडेल ला प्रशिक्षण देण्यासाठी 1 कोटी पेक्षा जास्त सॅम्पल वापरण्यात आले आहे. इंस्टाग्राम आणि फेसबुक या प्लॅटफॉर्मवर बरेच युजर्स फोटोज आणि व्हिडिओज पोस्ट करत असतात. त्यावेळी बऱ्याच जणांना फोटो एडिट करण्यासाठी वेगळ्या टूलचा वापर करावा लागतो. परंतु आता instagram आणि facebook वर उपलब्ध करण्यात आलेल्या नवीन टूल च्या माध्यमातून फोटो एडिट करण्यासाठी थर्ड पार्टी ॲप वापरण्याची गरज भासणार नाही.
EMU Video
मेटाने लॉन्च केलेले दुसरे AI टूल म्हणजे EMU Video हे आहे. या AI टूलच्या माध्यमातून युजर्स ला कन्टेन्ट आधारित व्हिडिओ तयार करण्यास परमिशन मिळते. याशिवाय टूल च्या माध्यमातून फक्त कंटेंट नाही तर फोटोज असलेले व्हिडिओ किंवा रील क्रिएट करता येतात. जेणेकरून युजर्स ला अप्रतिम अनुभव मिळेल. हे टूल 16 fps वर 512×512 पिक्सल रिझोल्युशन असलेला 4 सेकंदाचा व्हिडिओ बनवण्यासाठी मदत करते. त्यासाठी हे टूल दोन मॉडेलचा वापर करते. युजर्स या व्हिडिओ फीचर च्या माध्यमातून प्रॉम्ट टाकून हवा तसा व्हिडिओ बनवू शकतात.