टाइम्स मराठी । जर तुम्ही सतत Metro ने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कारण आता मेट्रोने आता एक नवीन सर्विस ग्राहकांसाठी उपलब्ध केली आहे. या सर्विसच्या माध्यमातून ग्राहकांचे लॅपटॉप मोबाईल यासारख्या गोष्टी चोरी होण्यापासून वाचतील. आणि ग्राहक सिक्युरली प्रवास करू शकतील.
काय आहे ही सर्विस
मेट्रो स्टेशनवर डीजीलॉकर सर्विस सुरू करण्यात आली आहे. या सर्विसच्या माध्यमातून मेट्रोतून प्रवास करणाऱ्या व्यक्तींना त्यांचे सामान सुरक्षित ठेवण्यास मदत होईल. डीजी लॉकर हे मेट्रो स्टेशनवर उपलब्ध करण्यात आलेले एक इलेक्ट्रॉनिक लॉकर आहे. हे इलेक्ट्रॉनिक लॉकर प्रवाशांना DMRC Momentum 2.0 या ॲपच्या माध्यमातून वापरता येईल. त्यासाठी ग्राहक हे डिजीलॉकर भाड्याने घेऊ शकतात.
तुम्ही देखील या डीजीलॉकरचा वापर करू इच्छित असाल तर खालील प्रोसेस फॉलो करा.
सर्वात आधी DMRC चे DMRC Momentum 2.0 हे मोबाईल ॲप डाऊनलोड करा.
डाउनलोड केल्यानंतर ॲप मध्ये तुम्हाला साइन अप करावे लागेल.
त्यानंतर तुम्हाला डीजीलॉकर हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
त्यानंतर तुम्हाला कोणत्या स्टेशनवर डीजीलॉकर भाड्याने पाहिजे आहे तो ऑप्शन निवडा.
त्यानंतर तुम्हाला विचारलेली संपूर्ण माहिती भरा.
माहिती भरल्यानंतर तुम्ही पेमेंट ऑप्शन वर क्लिक करून डिजीलॉकर साठी पेमेंट करू शकता.
डिजीलॉकर भाड्याने घेतल्यानंतर तुम्ही मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून लॉकर ओपन किंवा बंद करू शकतात.
हे लॉकर ओपन करण्यासाठी तुम्हाला डिजी लॉकर पिन टाकावा लागेल.
प्रत्येक तासाला भरावे लागतील एवढे पैसे
जर तुम्ही डीजीलॉकर एका तासासाठी घेत असाल तर 50 रुपये तुम्हाला डिजिलॉकरचे भाडे द्यावे लागेल. त्यानुसार 2 तासांसाठी 100 रुपये, 3 तासांसाठी 150 रुपये, अशा पद्धतीने 50 रुपये प्रत्येक तासाला वाढत जातात. डिजीलोकर भाड्याने घेण्यासाठी 6 तासांची लिमिट उपलब्ध करण्यात आली आहे.