MG Astor Black Storm Edition : उद्या लॉन्च होणार MG Astor चे Black Storm Edition; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

MG Astor Black Storm Edition | सणासुदीच्या काळात कार बाजारात अनेक नवीन गाड्या लॉन्च केल्या जात आहेत. आता येत्या 6 सप्टेंबर रोजी MG Astor चे Black Storm Edition देखील लॉन्च होणार आहे. टॉप-टियर सॅव्ही ट्रिमवर आधारित MG Astor लोकांना जास्त आवडेल अशी कंपनीची आशा आहे. MG Astor कारला आत आणि बाहेरून स्पोर्टी ब्लॅक मिळणार आहे. MG Astor कार ब्लॅक कलरमध्ये लॉन्च केली जाईल. ब्लॅक कलर हा अनेकांचा फेवरेट असल्यामुळे कार लॉन्च होण्यापूर्वीच तिची मागणी वाढली आहे.

   

एक्सटीरियर

Astor SUV बाहेरून दिसायला खूप कमाल आहे. या कारला (MG Astor Black Storm Edition) बाहेरून क्रोम अॅक्सेंटच्या जागी चमकदार ब्लॅक फ्रंट ग्रिल बसवण्यात आले आहे. ज्यामुळे त्याला स्पोर्टिनेस टच मिळेल. कारला ब्लॅक अलॉय व्हीलसोबत रेड ब्रेक कॅलिपर स्पोर्टी फील देत आहेत. या कारमध्ये कंपनी हेडलॅम्प आणि फॉग हाउसिंग, रूफ रेल, विंडो ट्रिम आणि टेल लॅम्प क्लस्टर्स देखील देऊ शकते. तर, समोर आणि मागील बंपर आणि विंग मिररवर लाल अॅक्सेंट मिळू शकतात. MG Astor मध्ये ‘ब्लॅकस्टॉर्म’ बॅजिंग त्याच्या फ्रंट फेंडरवर उपलब्ध आहे.

इंटीरियर – MG Astor Black Storm Edition

MG Astor Black Storm Edition आतील इंटीरियर विषयी जाणून घ्यायचे झालेच तर, कारमध्ये लाल सीट्स आणि डॅशबोर्ड आणि डोअर पॅनल्सवर लाल अॅक्सेंटसह ऑल-ब्लॅक इंटीरियर थीम देण्यात आली आहे. हे मॉडेल खूपच खास असल्यामुळे त्यामध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह 10.1-इंच टचस्क्रीन देण्यात आली आहे. यासोबत इन्फोटेनमेंट सिस्टम, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि ADAS, सहा एअरबॅग्ज, उपलब्ध आहेत. तसेच ABS, EBD, हिल स्टार्ट, हिलमध्ये डिसेंट कंट्रोल आणि ब्रेक असिस्टसह इतर अनेक खास फीचर्स MG Astor मध्ये देण्यात आले आहेत.

इंजिन

MG Astor मध्ये नियमित मॉडेल प्रमाणेच 1.5 लिटर, 4-सिलेंडर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 110bhp पॉवर आणि 144 Nm टॉर्क जनरेट करते. यात 1.3 लीटर, 3-सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिनचा पर्याय देखील आहे. जो 140bhp पॉवर आणि 220 Nm टॉर्क जनरेट करतो. तसेच , 5-स्पीड मॅन्युअल, 8-स्पीड सीव्हीटी ऑटोमॅटिक आणि 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक Black Storm Edition मध्ये देण्यात आला आहे

किंमत

MG Astor सेवी वेरिएंटर 17 लाख ते 18.69 लाख रुपय (एक्स-शोरूम) किमतीत उपलब्ध असेल. मात्र, या स्पेशल एडिशनची किंमत थोडी जास्त असण्याची शक्यता आहे. ही कार Hyundai Creta, Kia Seltos, Mahindra XUV 300 यासह इतर अनेक कारशी स्पर्धा करू शकते. त्यामुळे तिची किंमत देखील तशीच ठेवण्यात आली आहे.