MG Comet Gamer Edition लाँच; पहा किंमत आणि फीचर्स

टाइम्स मराठी (MG Comet Gamer Edition)भारतीय मार्केट मध्ये MG Motor India या कंपनीने देशातील सर्वात इलेक्ट्रिक कार लॉन्च केली आहे. या कार च नाव MG Comet EV असून ही कार स्पेशल गेमिंग एडिशन आहे. ही कंपनी बाजारामध्ये इलेक्ट्रिक कारचे एक हेवी मॉडेल देखील लॉन्च करणार आहे. या एमजी कॉमेट इव्ही गेमर मॉडेल ला मोर्टर या नावाने प्रसिद्ध असलेल्या टॉप गेमर्स नमन माथुर यांनी डिझाईन केलेलं आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 8.65 लाख रुपये एवढी आहे. ही कार Comet EV K पेस , प्ले , प्लॅश या व्हेरियंट पेक्षा 64999 रुपयांनी महाग आहे.

   

लूक आणि डिझाईन –

MG Comet EV गेमिंग एडिशनची लांबी 3 मीटर, उंची 1,640 मिमी आणि रुंदी 1,505 मिमी आहे. या कंपनीने या कारच्या चाक आणि दरवाजांवर निऑन एलिमेंट्स आणि बी पिल्लर वर गेमिंग स्टिकर लावले आहे. गाडीच्या इंटिरिअरमध्ये गेमिंग फील आणण्यासाठी खास प्रकारचा इंटिरियर देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. केबिनमध्ये या कंपनीने ग्लोइंग मटेरियल आणि निऑन लाईट पासून बनलेले नियॉन एलिमेंट्स बसवले असून या कारची चावी आणि बाकीचे एलिमेंट्स खास टेक्सचर मटेरियलने ट्रीट करण्यात आले आहे.

mg comet ev right front three quarter0

230 किलोमीटर पर्यंत रेंज – (MG Comet Gamer Edition)

MG Comet EV या कारमध्ये 17.3 kwh बॅटरी देण्यात आली आहे. एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर ही इलेक्ट्रिक कार तब्बल 230 किलोमीटर पर्यंत रेंज प्रदान करते. या कारमध्ये तीन ड्राईव्ह मोड उपलब्ध आहे. यात इको नॉर्मल आणि स्पोर्ट या मोडचा समावेश आहे. या कारच्या फीचर्स बद्दल बोलायचं झालं तर यामध्ये जीओ ई सिम सह एकीकृत 10.25 इंच चा टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम उपलब्ध आहे. त्याचबरोबर 10.25 इंच चा डिजिटल इन्स्ट्रुमेंट स्ट्रक्चर, पावर विंडो आणि 12 इंच स्टील व्हील यात दिले आहे.

mg comet ev left front three quarter0

किंमत किती?

MG Comet Gamer Edition ची किंमत ही सामान्य कॉमेट पेक्षा 65 हजार रुपयांनी जास्त आहे. 7.98 लाख पासून रुपयांपासून Comet EV च्या गेमिंग एडिशनची किंमत सुरु होते. तरकॉमेट प्ले आणि पुश व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत अनुक्रमे 9.28 लाख रुपये आणि 9.98 लाख रुपये आहे. गाडीच्या खरेदीसाठी कंपनीच्या वेबसाइट किंवा अधिकृत डीलरशिपशी संपर्क साधा.