MG Motors India ने लॉन्च केली नवीन Electric Sport Car; 501 KM रेंज

टाइम्स मराठी । भारतातील ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर कंपनी म्हणून ओळखली जाणारी MG Motors India ही कंपनी  भारतीय बाजारपेठेमध्ये वेगवेगळे वाहन लॉन्च करत असते. भारतात सध्या इलेक्ट्रिक वाहन खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे. वाढती महागाई आणि पेट्रोल डिझेलचे भाव यावर तोडगा म्हणून बरेच जण इलेक्ट्रिक वाहन खरेदी करतात. मात्र काही महिन्यांपासून इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती देखील प्रचंड वाढल्या आहेत. परंतु आता MG MOTORS ने सर्वात स्वस्ति इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार लॉन्च केली आहे. या लॉन्च करण्यात आलेल्या कारचे नाव MG Cyberster आहे. जाणून घेऊया या इलेक्ट्रिक कारचे स्पेसिफिकेशन आणि फीचर्स.

   

पावरट्रेन

MG Cyberster या लॉन्च करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक स्पोर्ट कार मध्ये 77 kwh बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 536 bhp ड्युअल मोटर सेटअपसह येते. आणि 725 nm पीक टॉर्क जनरेट करते. या कारच्या रेंज बद्दल बोलायचं झालं तर 3.2 सेकंदामध्ये 100 किलोमीटर स्पीड पकडण्यास सक्षम आहे. कंपनीने ही इलेक्ट्रिक कार RWD 501, RWD 580, AWD 520 या ३ व्हेरियेण्ट मध्ये लाँच केली आहे.

501 KM रेंज –

MG Cyberster च्या RWD 501 व्हेरिएंट मध्ये 64 kwh बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी सिंगल मोटरसह उपलब्ध असून 310 BHP पावर आणि 475 nm पीक टॉर्क जनरेट करते. ही इलेक्ट्रिक स्पोर्ट कार सिंगल चार्ज मध्ये 501 किलोमीटर पर्यंत रेंज प्रदान करते. RWD 580 या व्हेरियंट मध्ये कंपनीने 77KWH बॅटरी दिली आहे. ही बॅटरी सह सिंगल मोटर  RWD सेटअप सह येते. या व्हेरिएंटच्या रेंज बद्दल बोलायचं झालं तर, 4.9 सेकंदामध्ये 100 km एवढी रेंज पकडते. कंपनीच्या AWD 520 व्हेरिएंट बद्दल बोलायचं झालं तर, 77 KWH बॅटरी देण्यात आली आहे. या बॅटरी सोबत 2 मोटर देखील उपलब्ध करण्यात आली आहे. ही मोटर 536 BHP पावर आणि 725 nm पीक टॉर्क जनरेट करते. ही कार एकदा चार्ज केल्यानंतर तुम्हाला 502 किलोमीटर पर्यंत रेंज देईल. आणि कार 3.2 सेकंदात 100km पर्यंत स्पीड पकडते.

किंमत

MG Cyberster या लॉन्च करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक कार मध्ये कंपनीने तीन व्हेरियंट्स लॉन्च केले आहे. यात ग्लेमर एडिशन, स्टाईल एडिशन, पायोनियर एडिशन यांचा समावेश होतो. या इलेक्ट्रिक कार ची किंमत 3,19,900 चिनी युवान म्हणजेच  भारतीय चलनानुसार, 36,95,207 रुपये आहे. या इलेक्ट्रिक कारच्या ग्लेमर एडिशन ची किंमत  319,900 युवान म्हणजेच 36,95,207 रुपये आहे. स्टाईल एडिशन ची किंमत 339,800 युवान म्हणजेच 39 लाख रुपये एवढी आहे. या इलेक्ट्रिक कारच्या पायोनियर एडिशन ची किंमत 315,800 युवान म्हणजेच 41.5 लाख रुपये एवढी ठेवण्यात आली आहे.