टाइम्स मराठी । इंडियन मोबाइल कंपनी म्हणून नावाजलेली Micromax कंपनी आता चिनी ब्रँडला टक्कर देण्यासाठी नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. मायक्रोमॅक्सने बऱ्याच वर्षापासून कोणता स्मार्टफोन किंवा मोबाईल फोन भारतीय बाजारपेठेमध्ये लॉन्च केलेला नाही. परंतु आता या अपकमिंग स्मार्टफोनच्या माध्यमातून भारतीय बाजारपेठेमध्ये मायक्रोमॅक्स पुन्हा एन्ट्री करणार आहे. हा अपकमिंग स्मार्टफोन ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये लॉन्च करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
स्वदेशी कंपनी मायक्रोमॅक्स लवकरच भारतीय बाजारपेठेमध्ये आपले वर्चस्व गाजवणार आहे. मायक्रोमॅक्स ब्रांडने चिपसेटसाठी क्वॉलकॉम आणि मीडिया टेक दोन्हींसोबत संपर्क साधला होता. परंतु क्वॉलकॉमने ही डील करण्यास मनाई केली. यापूर्वी जून महिन्यामध्ये लावा, कार्बन आणि मायक्रोमॅक्स या भारतीय कंपन्या नवीन स्मार्टफोन भारतीय मार्केटमध्ये लॉन्च करतील असं सांगण्यात आलं होतं.
Micromax चा आगामी मोबाईल मीड रेंजमध्ये उपलब्ध होऊ शकतो. हा स्मार्टफोन पंधरा हजार रुपयांमध्ये भारतात लॉन्च होण्याची शक्यता आहे. या मोबाईलच्या स्पेसिफिकेशनबद्दल अजून तर कोणतीच माहिती मिळाली नसली तरी या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक प्रोसेसर देण्यात येऊ शकते. मायक्रोमॅक्सचा अपकमिंग स्मार्टफोन मायक्रोमॅक्स इन या सिरीजमध्ये ऍड करण्यात येऊ शकतो.
कोरोना महामारीच्या काळात चिनी ब्रँडवर बंदी घातल्यानंतर मायक्रोमॅक्सने काही स्मार्टफोन लॉन्च केले होते. या स्मार्टफोनला बऱ्यापैकी रिस्पॉन्स देखील मिळाला. त्यानंतर 2022 मध्ये जुलै महिन्यात मायक्रोमॅक्सने micromax In 2C हा स्मार्टफोन लॉन्च केला होता. त्यानंतर स्मार्टफोन ने कोणता स्मार्टफोन भारतामध्ये लॉन्च केला नाही. परंतु आता चिनी आणि विदेशी ब्रांडला टक्कर देण्यासाठी मायक्रोमॅक्स नवीन मोबाईल बाजारात आणणार आहे.