टाइम्स मराठी । Microsoft ने सरफेस इव्हेंट 2023 मध्ये Microsoft Copilot लॉन्च केले आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीने हे खास करून युजरच्या सुविधा साठी तयार केले आहे. जेणेकरून कंपनीची प्रॉडक्टिव्हिटी वाढेल आणि युजरचा अनुभव देखील मोठ्या प्रमाणात वाढू शकेल. Microsoft Copilot हे एक असिस्टंट टूल आहे. हे असिस्टंट टूल AI टेक्नॉलॉजीवर काम करते. जाणून घेऊया या असिस्टंट टूल बाबत.
सध्या आर्टिफिशियल इंटेलिजंटचा प्रत्येक ठिकाणी वापर होत आहे. त्यानुसार मायक्रोसॉफ्ट कंपनी देखील AI च्या नवीन जगामध्ये प्रवेश करत आहे. ज्यामुळे मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये बरेच बदल होतील आणि नवीन अपडेटेड टेक्नॉलॉजी सोबत मायक्रोसॉफ्ट जोडलं जाईल असं मायक्रोसॉफ्टचे कॉर्पोरेट व्हॉइस प्रेसिडेंट आणि कंजूमर चीप मार्केटिंग ऑफिसर युसूफ मेहदी यांनी सांगितलं.
काय आहे Microsoft Copilot टूल
Microsoft Copilot हे एक AI कॅम्पेनियर आहे. या असिस्टंट टूलच्या माध्यमातून तुम्ही तुमचे काम सोप्या पद्धतीने करू शकतात. हे टूल तुम्हाला वेब आणि वर्क डेटाच्या माध्यमातून मदत करते. एवढेच नाही तर तुमची प्रायव्हसी सुरक्षित ठेवण्यासाठी देखील मदत करते. या फीचरच्या माध्यमातून रोजची कामे सोप्या पद्धतीने होतील.
कशा पद्धतीने काम करेल हे फीचर
Microsoft Copilot हे फीचर्स सपोर्ट विंडोज 11 यासोबत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 26 सप्टेंबरला हे फीचर युजर साठी रोल आऊट करण्यात येणार आहे. त्याचबरोबर विंडोज 11 मध्ये 200 नवीन फीचर्स देखील कंपनीकडून देण्यात येणार आहे. एक नोव्हेंबर पासून copilot टूल मायक्रोसॉफ्ट 365 एंटरप्राइज आणि सर्वसाधारण व्यक्तींसाठी उपलब्ध करण्यात येईल. या AI टूल च्या माध्यमातून डॉक्युमेंट एडिट करणे, डिजिटल तयार करणे , ग्राफिक आणि सोशल मीडिया पोस्ट तयार करण्यासाठी मदत होईल.
Bing आणि Edge मध्ये देखील हे टूल वापरण्यात येणार
मायक्रोसॉफ्ट कंपनीने Bing आणि edge मध्ये देखील हे टूल वापरण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. सध्या Bing आणि edge हे दोन्ही प्लॅटफॉर्म अपग्रेड करण्यात आले आहे. Bing आणि edge मध्ये हे टूल वापरण्यात आल्यानंतर चॅट हिस्ट्रीच्या माध्यमातून पर्सनलाईज आन्सर देण्यात येईल. Bing आणि edge या दोन्ही प्लॅटफॉर्म मध्ये AI टूल देण्यात आल्यानंतर युजर्सला सर्व प्रकारची माहिती मिळेल आणि युजर्स सेव्ड फोटो आणि इमेजच्या माध्यमातून शॉपिंग देखील करू शकतील.
कंपनीने Bing आणि edge या प्लॅटफॉर्म वर DALL.E 3 हे मॉडेल अपडेट केले आहे. यासोबतच नवीन कंटेंट क्रेडेन्शियल देखील समाविष्ट केला आहे. यामुळे AI च्या माध्यमातून बनवण्यात आलेले फोटोज मध्ये अदृश्य डिजिटल वॉटर मार्क जोडण्यासाठी क्रिप्टोग्राफीक पद्धतीने वापर करण्यात येईल.