Microsoft ने Windows 11 डेस्कटॉप युजर साठी Live केले एनर्जी सेवर मोड टूल

टाइम्स मराठी । Microsoft कंपनीने Windows 11 डेस्कटॉप युजरसाठी एक एनर्जी सेवर मोड जारी केला आहे. या टूलच्या मदतीने युजर विजेची बचत करू शकतात. यासोबतच बॅटरी लाईफ देखील एक्सटेंड करू शकतात. हे नवीन टूल Windows 11 मध्ये पूर्वीपासून  उपलब्ध असलेले बॅटरी सेव्हर हे ऑप्शन एक्सटेंड आणि बॅटरी एन्हान्स करण्याचे काम करते. जाणून घेऊया या एनर्जी सेवर मोड या टूल बद्दल आणखीन माहिती.

   

बॅटरी लाईफ एक्सटेंड करण्यास करते मदत

मायक्रोसॉफ्ट कंपनीने ब्लॉगमध्ये सांगितले की, आम्ही 26002 सोबत एक Energy Saver Mode ची सुरुवात करत आहोत. हे एनर्जी सेवर मोड बॅटरी एन्हान्स करते आणि बॅटरी लाइफ एक्स्टेंड करण्यास मदत करते. कंपनीने बॅटरीचे आयुष्य वाढवण्यासाठी आणि ऊर्जेचा वापर कमी करण्यासाठी हे टूल्स उपलब्ध केले आहे. याबाबत मायक्रोसॉफ्टने ब्लॉग पोस्ट च्या माध्यमातून माहिती दिली.

अशा पद्धतीने वापरू शकतात हे टूल

Energy Saver Mode या टूलचा वापर करण्यासाठी युजर्सला सेटिंग मध्ये जाऊन, क्विक सेटिंग या माध्यमातून एनर्जी सेवर ऑप्शनला ऑन आणि ऑफ करावे लागेल. याशिवाय यूजर्स हा मोड बॅटरी लेवल ऑन होण्यासाठी देखील सेट करू शकतात. याबाबत मायक्रोसॉफ्ट ने सांगितले की, बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी हे टूल ऑप्टिमाइज करण्यात आले असले तरी देखील डेस्कटॉप चार्ज होत असताना देखील या टूलचा वापर करता येईल.

Windows 10 युजर्ससाठी उपलब्ध आहे हे फीचर

हे एनर्जी सेवर टूल केनरी चैनल मध्ये विंडोज 11 इनसाईडर साठी रोल आउट करण्यात येत आहे. यासोबतच मायक्रोसॉफ्ट आता विंडोज 10 युजर्स ला AI संचालित  Copilot फीचर्स उपलब्ध करून देत आहे. हे फीचर पूर्वी विंडोज 11 मध्ये उपलब्ध करण्यात आले होते. हे फीचर वापरण्यासाठी योग्य डिवाइस वाल्या युजर्सला रिलीज प्रीव्ह्यू बिल्ड इन्स्टॉल करण्याची गरज असेल. ज्यामध्ये AI संचालित Copilot एक्सेस असेल. रिलीज प्रीव्ह्यू बिल्ड इन्स्टॉल करण्यासाठी विंडोज 10  home किंवा pro वर Copilot हे फीचर वापरू इच्छित असलेल्या युजर्सला विंडोस इनसाईडर टेस्टर प्रोग्राम मध्ये नाव नोंदणी करावी लागणार आहे.