Mini Cooper Electric Car : 402 KM रेंजसह लाँच झाली दमदार Electric Car; पहा काय आहेत खास फीचर्स

Mini Cooper Electric Car । इलेक्ट्रिक वाहनांची चलती भारतीय बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. कार, स्कूटर, बाईक, एवढेच नाही तर ट्रॅक्टर देखील इलेक्ट्रिक व्हेरियंटमध्ये लॉन्च करण्यात येत आहे. एकीकडे वाढत्या पेट्रोल डिझेलचे भाव आणि दुसरीकडे इलेक्ट्रिक वाहनांची डिझाईन लूक सर्वसामान्य नागरिकांना आकर्षित करतो. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांना जास्त डिमांड आहे. अशातच मिनी कूपर या कंपनीने नवीन इलेक्ट्रिक डेब्यू कार लॉन्च केली आहे. या कारला चिनी कंपनी स्पॉटलाईट ऑटोमोटिव्हने डिझाईन आणि डेव्हलप केले आहे. या कारच्या किमतीत बद्दल अजून कंपनीने खुलासा केलेला नसून याच वर्षी ही इलेक्ट्रिक कार इंडियामध्ये लॉन्च करण्यात येणार आहे.

   

डिझाईन– Mini Cooper Electric Car

इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये लॉन्च करण्यात आलेली नवीन मिनी कूपर या कारमध्ये बरेच बदल करण्यात आले आहे. या कंपनीने सध्या सुरू असलेल्या IAA मोबिलिटी 2023 मध्ये पूर्णपणे इलेक्ट्रिक कूपर चे नवीन जनरेशन मॉडेल लॉन्च केले आहे. हे इलेक्ट्रिक कार नवीन बिस्पोक प्लॅटफॉर्मवर बेस्ड असणार आहे. त्याचबरोबर नवीन जनरेशन कारच्या डिझाईन मध्ये बरेच बदल करण्यात आले आहे. यामध्ये सिग्नेचर स्टायलिंग एलिमेंट्स वापरण्यात आले असून गोल हेड लॅम्प क्लस्टर , अष्टकोनी फॉक्स पॅनल देण्यात आले आहे. या इलेक्ट्रिक कार मध्ये क्रोमचा वापर करण्यात आलेला नसून फ्लश फिटिंग डोर हँडल , डायल डाऊन व्हील आर्क यासह क्लिनर साईड प्रोफाइल देखील उपलब्ध आहे. यासोबतच या इलेक्ट्रिक कार मध्ये फ्रंट फेंडर्स वर फॉक्स एअर वेन्ट देण्यात आलेला नसून मागच्या साईडने नवीन त्रिकोणी आकाराचा टेललॅम्प देण्यात आला आहे. यासोबतच फ्लॅट रूफ यामध्ये उपलब्ध आहे.

बेस व्हेरिएन्ट बॅटरी पॅक आणि रेंज

या इलेक्ट्रिक कुपरमध्ये (Mini Cooper Electric Car) कंपनीने दोन वेरियंट लॉन्च केले आहे. यामध्ये दोन वेगवेगळे बॅटरी पॅक देण्यात आले आहे. या इलेक्ट्रिक कारच्या बेस व्हेरिएन्टमध्ये 40.7 किलोवॉटची बॅटरी पॅक देण्यात आली आहे. ही बॅटरी फ्रंट एक्सेल माउंटेन बॅटरीला पावर देते. या इलेक्ट्रिक कार मध्ये देण्यात आलेली बॅटरी 7.3 सेकंदामध्ये 100 किलोमीटर पर्यंत रेंज पकडते. एकदा फुल्ल चार्ज झाल्यानंतर ही कार 305 किलोमीटर पर्यंत रेंज देते.

टॉप वेरियंट बॅटरी पॅक आणि रेंज

इलेक्ट्रिक कूपर कार च्या दुसऱ्या वेरियंट म्हणजेच टॉप वेरियंट ला SE नाव देण्यात आले आहे. यामध्ये मोठा बॅटरी पॅक देण्यात आला आहे. ही बॅटरी 54.2 किलोवॉट सह येते. ही बॅटरी फ्रंट व्हीलला मोटर पावर सप्लाय करेल. या कारमध्ये देण्यात आलेली इलेक्ट्रिक मोटर 215 बीएचपी पावर प्रदान करते. आणि 329 NM पीक टॉर्क जनरेट करते. या कारमध्ये देण्यात आलेली बॅटरी सिंगल चार्जवर 402 किलोमीटर पर्यंत रेंज देते. एवढेच नाही तर 6.3 सेकंदामध्ये शंभर किलोमीटर पर्यंत रेंज पकडते.