सार्वजनिक चार्जिंग पॉइंट वर Mobile चार्ज करताय? बँक अकाउंट होईल रिकामे

टाइम्स मराठी । दिवसेंदिवस वाढणारा मोबाईलचा वापर आणि ऑनलाइन बँकिंगच्या जगात सायबर क्राईम मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. सतत वेगवेगळ्या प्रकारचे सायबर गुन्हे संबंधित न्यूज आपण ऐकत असतो. यासोबतच सायबर स्कॅमर देखील अत्यंत ऍक्टिव्ह झाले असून फ्रॉडींग साठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करत आहेत. बऱ्याचदा आपण OTP सांगितल्या  नंतर आपल्या अकाउंट मधील पैसे गेल्याचे ऐकले असेल. अशा घटना सतत घडत असतात. या घटनांपासून वाचण्यासाठी आपण सतर्क राहणे गरजेचे आहे. जेणेकरून आपले बँक अकाउंट रिकामे होणार नाही. यासोबतच पर्सनल माहिती आणि डेटा देखील लीक होणार नाही.

   

ज्यूस जॅकिंग स्कॅम

ज्यूस जॅकिंग स्कॅम हा एक सायबर गुन्हा आहे. ज्याच्या माध्यमातून सायबर क्रिमिनल्स मोबाईल मधील सर्व महत्त्वाचा डेटा चोरतात. यासोबतच  बँक अकाउंट देखील या स्कॅमच्या माध्यमातून खाली होऊ शकते. आणि यामुळे आर्थिक नुकसान देखील होऊ शकते. या स्कॅमच्या माध्यमातून तुम्हाला कोणताच फोन किंवा ओटीपी येत नाही. तरीही सुद्धा ज्यूस जॅकिंग स्कॅम च्या माध्यमातून बँक अकाउंट मधील पैसे जातात. यासाठी सार्वजनिक चार्जिंग स्टेशन चा वापर करण्यात येत आहे.

सार्वजनिक चार्जिंग स्टेशनचा वापर केल्यामुळे होऊ शकते नुकसान

एखाद्या वेळेस आपल्या मोबाईल मध्ये चार्जिंग नसेल तर आपण सार्वजनिक चार्जिंग पॉईंटचा वापर करतो. परंतु या सार्वजनिक चार्जिंग पॉइंटवर मोबाईल चार्जिंगला लावल्यानंतर तुमच्या अकाउंट मधील पैसे गायब होऊ शकतात. या चार्जिंग स्टेशनवर मैलवेयर या प्रकारचे सॉफ्टवेअर किंवा हार्डवेअर इन्स्टॉल करण्यात येते. त्यानंतर या चार्जिंग स्टेशनला चार्जिंगला लावण्यात आलेला मोबाईलमध्ये मैलवेयर ट्रान्सफर करण्यात येतात. त्या मोबाईल मधील कॉलिंग डेटा, पासवर्ड, ईमेल ही सर्व माहिती स्कॅमर ला मिळते. आणि तुमचा संपूर्ण डाटा स्कॅमरच्या हातात येतो. यासोबतच बँकिंग डिटेल्स आणि फोन पे, गुगल पे यासारख्या ॲपचे ॲक्सेस देखील या स्कॅमरला मिळतात.

USB केबलचा करा वापर

अमेरिकेच्या इंडिपेंडेंट एजन्सी फेडरल कम्युनिकेशन कमिशन यांनी ज्यूस जॅकिंग या स्कॅम पासून आणि घोटाळ्यापासून वाचण्यासाठी सार्वजनिक चार्जिंग स्टेशन वापरणं टाळण्यास सांगितले आहे. परंतु या चार्जिंग स्टेशन चा वापर करणे अत्यंत गरजेचं असेल तर त्या ठिकाणी असलेली केबल तपासून घ्या. जर या केबल मध्ये काही शंका असल्यास तुम्ही USB केबल बदलून वापरू शकतात. ज्यूस जॅकिंग या घोटाळ्यापासून वाचण्यासाठी आणखीन काही उपाय करणे गरजेचे आहे.

या स्कॅम पासून वाचण्यासाठी करा हे उपाय

1) तुम्ही मोबाईल पासवर्ड ने सुरक्षित करू शकतात.
2) तुमचा मोबाईल अँटीव्हायरस सॉफ्टवेअर अपडेट करा.
3) तुमचा मोबाईल कोणीही वापरू नये किंवा सेफ्टी साठी फिंगरप्रिंट स्कॅनर किंवा फेस आयडी चा वापर करा.
4) सार्वजनिक वायफाय नेटवर्क वापरणे टाळा.
5) जेव्हा तुम्ही पब्लिक चार्जिंग स्टेशनवर मोबाईल चार्ज साठी लावतात, त्या ठिकाणी trust this computer, charge only हे ऑप्शन दिले जातात.
6) या ऑप्शन पैकी तुम्ही चार्ज ओन्ली ऑप्शन सिलेक्ट करू शकतात.