Mobile चार्जिंग करताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी; अन्यथा बॅटरीला होऊ शकतो प्रॉब्लेम

टाइम्स मराठी । मोबाईल हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. आपण दिवसभर आपला मोबाईल सोबत बाळगत असतो. अशातच आपल्या मोबाईलचे चार्जिंग संपले किंवा कमी झाले तरी आपली चिडचिड होत असते. अनेकांना दिवसात बऱ्याचदा मोबाईल चार्जिंग करायची सवय असते. काहीजण मोबाईल हातात घेऊनच चार्जिंग करत असतात. परंतु मोबाईल ही सुद्धा एक वस्तूच आहे, त्यामुळे तो खराब होण्यापासून वाचवण्यासाठी मोबाईल चार्जिंग किती वेळ आणि केव्हा करावे हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे.

   

चार्जिंग करण्याच्या चुकीच्या सवयींमुळे तुमचा मोबाईल काही कालावधीनंतर खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे योग्य पद्धत जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. आपल्या मोबाईलची चार्जिंग 20 % पेक्षा कमी होऊ देऊ नका. त्याचप्रकारे 80% किंवा त्यापेक्षा जास्त चार्जिंग झाल्यास प्रॉब्लेम येऊ शकतो. बऱ्याचदा काही लोक त्यांच्या मोबाईलची बॅटरी 100% चार्जिंग करतात. आणि तसाच मोबाईल चार्जिंगलाच राहू देतात. हे अत्यंत चुकीचं असून मोबाईलची पूर्णपणे चार्जिंग संपणे मोबाईल डेड होणे हे देखील नुकसानदायक आहे.

मोबाईल चार्जिंग साठी 20- 80 चा फॉर्म्युला –

तुम्ही मोबाईल चार्जिंग करण्यासाठी 20- 80 चा नियम वापरू शकतात. हा 20-80 चा नियम म्हणजे तुमच्या मोबाईल ची बॅटरी 20% पर्यंत झाल्यावर चार्जिंग ला लावा. आणि 80% बॅटरी चार्ज झाल्यावर चार्जिंग थांबवा. तुमच्या मोबाईलची बॅटरी 20% असल्यावर किंवा त्यापेक्षा कमी असल्यास बॅटरी लो असा अलर्ट दिला जातो. त्यावेळी तुम्ही मोबाईल चार्जिंगला लावू शकतात आणि चार्जिंग बद्दल होणाऱ्या काही चुका सुधारू शकतात. जेणेकरून तुमचा मोबाईल खराब होण्यापासून वाचू शकतो.