जुलैमध्ये लॉन्च झाले हे जबरदस्त Mobile; तुम्हीही म्हणाल खरेदी करूयाच

टाइम्स मराठी । मोबाईल हि आजकाल जीवनावश्यक गोष्ट बनली आहे. अगदी लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत, सर्वानाच मोबाईलचे वेड असत. अनेकजण तर सतत नवनवीन मोबाईल घेण्याचा प्रयत्न करत असतात. देशभरात मोबाईलची वाढती मागणी पाहता अनेक स्मार्टफोन निर्माता कंपन्या एकापेक्षा एक मोबाईल बाजारात आणत आहे. तुम्ही सुद्धा नवीन आणि अपडेटेड मोबाईल खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या जुलै महिन्यात आत्तापर्यंत कोणकोणते मोबाईल लाँच झाले याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. त्यानुसार तुम्हीच ठरवा कोणता मोबाईल तुमच्यासाठी बेस्ट ठरेल.

   

1) Samsung Galaxy M34 smartphone-

जर तुम्ही कमी किमतीमध्ये चांगला स्मार्टफोन खरेदी करू इच्छित असाल तर जुलै महिन्यात लॉन्च झालेला Samsung Galaxy M34 हा तुम्ही खरेदी करू शकतात. याची किंमत 16,999 आहे. यामध्ये 6000 MAH बॅटरी देण्यात आली आहे. या स्मार्टफोनच्या फीचर्स बद्दल बोलायचं झालं तर यामध्ये सुपर AMOLED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट सह देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर व्हिजन बूस्टर टेक्नॉलॉजी सह हा स्मार्टफोन फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. या स्मार्टफोनच्या कॅमेरा बद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आलेला आहे.

2) Realme Narzo 60

प्रसिद्ध मोबाईल ब्रँड Realme चा Narzo 60 हा स्मार्टफोन सुद्धा परवडणाऱ्या किमतीत बाजारात उपलब्ध आहे. हा मोबाइल Realme Narzo 60 5G आणि Realme Narzo 60 5G Pro या २ व्हेरिएन्ट मध्ये लाँच झाला आहे. Realme Narzo 60 ची किंमत 17,999 एवढी असून यामध्ये 5000MAH बॅटरी देण्यात आलेली आहे. हि बॅटरी 67W SuperVOOC फार्स्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यामध्ये 90Hz रिफ्रेश रेट सह 6.43 इंच फुल एचडी सुपर AMOLED कर डिस्प्ले देण्यात आलेला आहे. मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास यामध्ये 64 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि सेल्फी साठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

3) Oneplus Nord 3 –

Oneplus कंपनीने देखील २ स्मार्टफोन जुलै महिन्यात भारतात लॉन्च केले. यामध्ये पहिला म्हणजे Oneplus Nord 3 हा स्मार्टफोन. याची किंमत 33,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन 5 जुलैला भारतात लॉन्च करण्यात आला होता. या स्मार्टफोनच्या फीचर्स बद्दल बोलायचं झालं तर यामध्ये 6.74 इंच चा एमोलेड डिस्प्ले देण्यात आलेला असून हा 120 रिफ्रेश रेट सह उपलब्ध आहे. यामध्ये ट्रिपल रियल कॅमेरा सेटअप असून प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सल, सेकंडरी अल्ट्रा वाईड कॅमेरा 8 मेगापिक्सल, आणि 2 मेगापिक्सलची मायक्रो लेन्स या स्मार्टफोनमध्ये देण्यात आलेली आहे.

4) Oneplus Nord CE 3 5G-

वन प्लस कंपनीचा Oneplus Nord CE 3 5G हा किफायती स्मार्टफोन 6.7 इंच एमोलेड डिस्प्ले सह येतो. या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 782 G प्रोसेसर वापरण्यात आले आहे. त्याचबरोबर यामध्ये 5000MAH बॅटरी उपलब्ध आहे. मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास यामध्ये 50 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा आणि 2 मेगापिक्सल चा मॅक्रो कॅमेरा मिळतोय. याशिवाय सेल्फी आणि विडिओ कॉल साठी मोबाईल मध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनची किंमत 37,999 रुपये आहे.

5) Oppo Reno 10 Pro plus

Oppo कंपनीने देखील नुकतेच तीन स्मार्टफोन लॉन्च केले. हे स्मार्टफोन Oppo च्या Reno 10 ची सिरीज आहे. तुम्हाला हा स्मार्टफोन घ्यायचा असेल तर 13 जुलै पर्यंत वाट बघावी लागेल. ओप्पो कंपनीच्या Oppo Reno 10 Pro plus या सिरीज मध्ये 64 मेगापिक्सल चा पेरिस्कोप कॅमेरा देण्यात आलेला असून 50 मेगापिक्सल चा सोनी कॅमेरा, आठ मेगापिक्सल चा वाईड अँगल कॅमेरा, 32 मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर यामध्ये 4700 mAh बॅटरी आहे. ती 100 W वर फास्ट चार्जिंग होते. हा स्मार्टफोन 54,999रुपयांना उपलब्ध आहे.

6) Oppo Reno 10 Pro

Oppo Reno 10 Pro या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये 32 मेगापिक्सल टेली फोटो पोट्रेट कॅमेरा असून 50 मेगापिक्सल IMX890 अल्ट्रा क्लियर प्रायमरी कॅमेरा आणि आठ मेगापिक्सल अल्ट्राव्हाइड कॅमेरा लेन्स आणि फ्रंट कॅमेरा मध्ये 32 मेगापिक्सल IMX709 लेन्स आहे. या मध्ये 4600 mAh बॅटरी देण्यात आलेली असून 80 w वर फास्ट चार्ज होते. हे दोन्ही सिरीज Android 13 बेस्ड ColorOS 13.1 या ऑपरेटिंग सिस्टीम वर काम करतात. हा स्मार्टफोन 39,999 रुपयांनी उपलब्ध आहे.

7) Nothing Phone 2

हा स्मार्टफोन काल लॉन्च झाला आहे. यामध्ये 50+50MP ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8th प्लस 1 जनरेशन प्रोसेसर देण्यात येणार आहे. त्याचबरोबर यामध्ये 6.7 इंच चा डिस्प्ले सह 4700 MAH बॅटरी सुद्धा देण्यात येईल. मोबाईलच्या किमतीबाबत सांगायचं झाल्यास 8GB+128GB व्हेरिएन्टची किंमत 44,999 रुपये, 12GB+256GB व्हेरिएन्टची किंमत 49,999 रुपये आणि 12GB+512GB व्हेरिएन्टची किंमत 54,999 रुपये आहे.