Mobile हरवला तरी No Tension; सरकारी पोर्टलवर ‘अशा’ प्रकारे शोधा

टाइम्स मराठी । आजच्या या आधुनिक जगात अन्न वस्त्र निवाराप्रमाणे मोबाईल (Mobile) देखील गरजेचा झाला आहे. मोबाईल शिवाय आजकाल कोणतेच काम पूर्ण होत नसल्याचे दिसून येते. मोठेच नाही तर लहानांमध्ये सुद्धा मोबाईलची मोठ्या प्रमाणात क्रेझ आहे. आपल्या जीवनातील काही महत्त्वाच्या गोष्टी काही डॉक्युमेंट सुद्धा आपण मोबाईल मध्ये ठेवत असतो. अशावेळी तर तुमचा मोबाईल चोरीला गेला तर? ऐकूनच धक्का बसला ना? पण घाबरू नका. आता तुम्ही सरकारच्या मदतीने तुमचा हरवलेला मोबाईल शोधू शकता. .

   

आज काल मोबाईल चोरी होण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहे. यासोबतच पर्सनल डेटा चोरी होणे, फोटोज व्हिडिओज यासारख्या गोष्टी लिंक होण्याची देखील भीती मोठ्या प्रमाणात असते. अशावेळी घाबरून न जाता तुम्ही सरकारच्या संचार साथी पोर्टल ला जाऊन तुमचा मोबाईल ट्रॅक करू शकतात. यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार करावी लागेल. त्या कम्प्लेंट नंबरच्या मदतीने तुम्ही सरकारच्या संचार साथी पोर्टलचा वापर करून ब्लॉक किंवा ट्रॅक करू शकतात. ही नोंदणी केल्यानंतर तुम्हाला ट्रेकिंग नंबर मिळेल. या नंबरच्या माध्यमातून तुम्ही हरवलेल्या मोबाईलचे स्टेटस देखील चेक करू शकतात. आणि तुम्ही मोबाईल मिळाल्यानंतर याच पोर्टलच्या माध्यमातून तुमचा मोबाईल अनब्लॉक देखील करू शकतात.

तुमचा मोबाईल हरवल्यावर डेटा लिक होण्याची भीती असते. हा डेटा लिक होऊ नये यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल ब्लॉक करणे गरजेचे आहे. यासाठी तुम्ही संचार साथी पोर्टल ला जाऊन मोबाईल ब्लॉक करू शकतात. परंतु त्यासाठी तुम्हाला मोबाईल चा IMEI नंबर माहिती असणे गरजेचे आहे. या नंबर शिवाय तुमचा मोबाईल शोधणे अशक्य आहे. त्याचबरोबर संचार साथी पोर्टलवर तुम्हाला तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत हे देखील समजू शकते.

मोबाईल हरवल्यावर किंवा चोरी गेल्यावर अशा पद्धतीने करा ब्लॉक

1) सर्वात आधी संचार साथी पोर्टल च्या http://sancharsaathi.gov.in/ या वेबसाईटला भेट द्या.

2) या वेबसाईटवर गेल्यावर तुम्हाला होम पेज वर असलेल्या Citizen Centric Services या ऑप्शन वर क्लिक करावं लागेल.

3) या ऑप्शनवर गेल्यानंतर तुम्हाला तुमचा हरवलेला मोबाईल ब्लॉक करण्याचा ऑप्शन दिसेल.

4) ब्लॉक युअर लॉस्ट या ऑप्शन वर तुम्ही क्लिक करा.

5) या ऑप्शन नंतर तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल.

6) या फॉर्ममध्ये सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर सह IMEI हा नंबर टाकावा लागेल.

7) त्यानंतर तुम्हाला मोबाईलचा मॉडेल नंबर, मोबाईल खरेदीचे बिल अपलोड करावे लागेल.

8) यानंतर तुमचा मोबाईल ज्या तारखेला चोरी गेला किंवा हरवला असेल ती तारीख वेळ जिल्हा आणि राज्याची माहिती द्यावी लागेल.

9) एवढेच नाही तर तुम्हाला FIR ची प्रत देखील यासोबत जोडावी लागेल.

10) यानंतर तुम्हाला तुमची पर्सनल माहिती म्हणजेच नाव ईमेल आयडी पत्ता हे भरावे लागेल.

11) यानंतर डिस्क्लेमर हा ऑप्शन निवडून फॉर्म सबमिट करा.

12) फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुमचा मोबाईल ब्लॉक केला जाईल.