भारतात गेल्या 9 वर्षांमध्ये 20 पटीने वाढले मोबाईलचे उत्पादन

टाइम्स मराठी । मोबाईल इंडस्ट्रीची वाढ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भारतामध्ये 99.2 टक्के मोबाईल फोन मेड इन इंडिया असल्याचे ट्विट केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विटरच्या माध्यमातून केलं आहे. त्यांनी स्मार्टफोन उत्पादनांच्या वाढत्या संख्येवर लक्ष केंद्रित करत एक आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी  ट्विटर वर पोस्ट शेअर करत माहिती दिली. गेल्या 9 वर्षांमध्ये देशातील स्मार्टफोनचे उत्पादन 20 पटीने वाढल्याचे देखील त्यांनी सांगितलं.

   

काय म्हणाले अश्विनी वैष्णव

ट्विटर वर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, 2014 मध्ये भारतीय स्मार्टफोन व्यवसाय हा 78% आयातीवर अवलंबून होता. त्यानुसार 78% स्मार्टफोन हे दुसऱ्या देशातून विकत घेतले जात होते. परंतु आता मेड इन इंडिया च्या माध्यमातून भारतात डेव्हलप केले गेलेले 99.2% फोन हे स्वदेशातच विक्री करण्यात आले आहे. जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्याच्या काळात भारतात 4.3 कोटी स्मार्टफोनची विक्री करण्यात आली.

आंतरराष्ट्रीय ब्रँड देखील करत आहे स्मार्टफोनची असेंबलिंग

स्मार्टफोन इंडस्ट्री मध्ये झालेली वाढ ही भारत विदेशी आयातीवर अवलंबून नसल्याचे स्पष्ट करते. गुगल कंपनीने भारतामध्ये स्मार्टफोन निर्माण करण्यासाठी सुरुवात करणार असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर कंपनीने देशात दोन स्मार्टफोनची असेंबलिंग सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. गुगलच नाही तर Apple कंपनीचे लेटेस्ट लॉन्च करण्यात आलेले  iphone 15 आणि iphone 15+ हे स्मार्टफोन मॉडेल देखील भारतातच डेव्हलप करण्यात आले. आतापर्यंत भारतात लाखो मेड इन इंडिया आयफोनची विक्री करण्यात आली आहे.

Samsung ने 18% मार्केट शेअर सह पटकावले पहिले स्थान

भारतीय बाजारपेठेत Xiaomi , Samsung , Realme , यासारख्या बऱ्याच स्मार्टफोन निर्माता कंपन्या उपलब्ध आहेत. त्यापैकी Samsung कंपनीने  18% मार्केट शेअर सोबतच पहिले स्थान पटकावले आहे. मार्केट रिसर्च फॉर्म कॅनॉलिस यांच्या मते Samsung कंपनीने दुसऱ्या तिमाहीत 18% मार्केट शेअर सह हे स्थान पटकावले. या काळात कंपनीने  79 लाख स्मार्टफोनची विक्री केली. त्याचबरोबर Xiaomi कंपनीने गेल्या 3 महिन्यांच्या कालावधीत 76 लाख स्मार्टफोनची घाऊक विक्री केली. Xiaomi कंपनी शेअर च्या बाबतीत दुसऱ्या स्थानावर आहे. तिसऱ्या स्थानावर Vivo हा ब्रँड असून Vivo कंपनीने 72 लाख स्मार्टफोनची विक्री केली. चौथ्या स्थानावर Realme ही कंपनी आहे. Realme कंपनीने 58 लाख स्मार्टफोन विक्री केली असून ऑप्पो कंपनीने 44 लाख विक्रीसह पाचवे स्थान पटकावले आहे.