या 7 सीक्रेट कोडच्या माध्यमातून मोबाईल ठेवा सुरक्षित; डेटा आणि नंबर होणार नाही हॅक

टाइम्स मराठी । मोबाईल हा आजकाल अत्यंत गरजेचा झाला आहे. कोणत्याही कामासाठी मोबाईलची गरज पडत असल्यामुळे मोबाईल शिवाय घराच्या बाहेर पडणे सुद्धा काही जणांना जमत नाही. कारण स्मार्टफोनच्या माध्यमातून बरेच व्यक्ती पैसे कमवत असतात. शिवाय ऑफिसची कामे देखील स्मार्टफोनवर करणे सोपे होते. पूर्वी ऑफिशियल कामांसाठी कम्प्युटरचा वापर व्हायचा. परंतु मोबाईलमध्ये बऱ्याच सुविधा उपलब्ध असल्यामुळे कोणतेही ऑफिशियल काम मोबाईलच्या माध्यमातून करता येते. ज्याप्रमाणे मोबाईल वापर वाढला त्याचप्रमाणे सायबर क्राईम चे गुन्हे देखील मोठ्या प्रमाणात वाढले.

   

सायबर क्राईमला आळा घालण्यासाठी सरकारकडून वेगवेगळे नियम लावण्यात येत आहे. परंतु दिवसेंदिवस सायबर क्राईमचे प्रमाण प्रचंड वाढत आहे. प्रत्येक व्यक्ती आपला मोबाईल सिक्युअर ठेवण्यासाठी वेगवेगळे ऑप्शन वापरत असते. जेणेकरून मोबाईल मधील डेटा प्रायव्हेट आणि सिक्युअर राहील. साधारणपणे मोबाईलला आणि एप्लीकेशन ला लॉक लावणे हे ऑप्शन स्मार्टफोन सिक्युअर करण्यासाठी बरेच जण वापरत असतील. पण तुम्हाला स्मार्टफोन मध्ये असलेले सिक्रेट कोड्स माहिती आहेत का? जेणेकरून सिक्रेट कोड च्या माध्यमातून तुम्ही स्मार्टफोन सायबर क्राईम चा शिकार होण्यापासून वाचवू शकाल. जाणून घेऊया कोणते आहेत हे कोड्स.

१) कॉल फॉरवर्डिंग

जर तुम्हाला तुमचा कॉल आणि डेटा फॉरवर्ड करण्यात येत असल्याचा डाउट येत असेल तर तुम्ही *#21# या सिक्रेट कोड चा वापर करून तुमचा डाऊट क्लिअर करू शकतात. या कोडच्या माध्यमातून तुम्हाला तुमचा कॉल आणि डेटा सिक्युअर आहे की नाही हे समजेल.

२) सेन्सर वर्क

0# या कोडच्या मदतीने तुम्ही तुमच्या स्मार्टफोनचा डिस्प्ले, स्पीकर, कॅमेरा आणि सेंसर हे व्यवस्थित काम करत आहे की नाही हे पाहू शकतात. या कोडच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या स्मार्टफोन मध्ये उपलब्ध असलेल्या एप्लीकेशन वर नजर ठेवता येईल.

३) SAR VALUE

स्मार्टफोन मध्ये काही सिक्रेट कोड्स उपलब्ध असतात. या कोडच्या माध्यमातून तुम्ही तुमचा मोबाईल सिक्युअर करू शकता. त्यानुसार तुम्ही #07# हा कोड डायल केल्यास तुम्हाला स्मार्टफोनची SAR VALUE समजेल. या सार व्हॅल्यूच्या मदतीने मोबाईल मधून निघणारे रेडिएशन याबाबत माहिती मिळते. ही सार व्हॅल्यू 1.6 पेक्षा कमी असणे गरजेचे आहे.

४) IMEI नंबर

एखाद्या व्यक्तीचा मोबाईल हरवल्यावर तो शोधण्यासाठी IMEI नंबरची गरज असते. जर तुम्हाला तुमच्या मोबाईलचा IMEI नंबर माहित नसेल तर *#06# हा कोड डायल करून तुम्ही तुमच्या मोबाईलचा IMEI नंबर मिळवू शकतात.

५) कॅमेरा

जर तुम्हाला तुमचा कॅमेरा सुरळीत सुरू आहे का? हे तपासायचे असेल किंवा कॅमेरा व्यवस्थित सपोर्ट करत आहे की नाही हे तपासायचे असल्यास ##34971539## हा सिक्रेट कोड डायल करा. या कोडच्या माध्यमातून तुम्हाला कॅमेरा व्यवस्थित सुरू आहे की नाही याची खात्री पटेल.

६) बॅटरी

तुम्हाला इंटरनेट, वाय-फाय, बॅटरी याबद्दलची माहिती हवी असेल तर ##4636## हा सिक्रेट कोड डायल करा. या कोडच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये उपलब्ध असलेल्या वायफाय इंटरनेट सुविधा आणि बॅटरी बद्दल माहिती मिळेल.

७) रिसेट

तुम्हाला तुमचा स्मार्टफोन रिसेट करायचा असेल तर 2767*3855# हा कोड डायल करा. हा कोड डायल केल्यानंतर तुमच्या मोबाईलचा संपूर्ण डेटा रिसेट होईल.