Mobile Under 7000 । 7000 रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळतोय हा Mobile; फीचर्सही आहेत दमदार

Mobile Under 7000 । सर्वत्र फेस्टिवल सिझनची तयारी दिसून येत आहे. या फेस्टिवल सीझनमध्ये बरेच जण नवनवीन वस्तू प्रॉडक्ट खरेदी करत असतात. सणासुदीच्या काळात खरेदी करणं भारतात शुभ मानलं जाते, त्यामुळे या फेस्टिवल सीझनमध्ये बऱ्याच कंपन्या त्यांच्या प्रॉडक्टवर बंपर डिस्काउंट ऑफर देखील उपलब्ध करत असतात. यामुळे ग्राहकांना कमी किमतीमध्ये डिस्काउंट च्या माध्यमातून प्रोडक्ट खरेदी करणे सोपे होते. तुम्ही जर सध्या स्वस्तात मस्त असा मोबाईल खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हला अशा एका मोबाईल बाबत सांगणार आहोत जो तुम्ही अवघ्या 7000 रुपयांत खरेदी करू शकता.

   

आम्ही तुम्हाला जय मोबाईल बाबत सांगत आहोत त्याचे नाव आहे itel P40+…. फेस्टिवल सीजन मध्ये  itel P40+ या स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंट देण्यात येत आहे. त्यानुसार तुम्ही Amazon वरून हा मोबाईलखरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला बंपर डिस्काउंट च्या माध्यमातून हा स्मार्टफोन 7000 रुपयांपेक्षा कमी किमतीत (Mobile Under 7000) मिळू शकतो. या मोबाईलची मूळ किंमत 9999 रुपये आहे. परंतु Amazon वर हा स्मार्टफोन 8,499 मध्ये खरेदी करता येऊ शकतो. एवढेच नाही तर बँक ऑफर आणि गिफ्ट देखील स्मार्टफोनवर उपलब्ध आहे. बँक ऑफरनुसार तुम्ही हा मोबाईल 7,649 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. कंपनीने या मोबाईल सोबत ग्राहकांना 2399 रुपयांचे बर्ड्स देखील उपलब्ध केले आहे. त्यानुसार या फेस्टिवल सीझनमध्ये बंपर धमाल उडणार आहे.

स्पेसिफिकेशन

itel P40 + या स्मार्टफोनमध्ये 6.8 इंच चा HD + IPS डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 720 × 1640 पिक्सेल रिझोल्युशन आणि 90 hz रिफ्रेश रेट सह येतो. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये ऑक्टाकोर युनिसोक T606 प्रोसेसर दिला आहे. तसेच महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये तुम्हाला 7000 mAh बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 18 W च्या फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते

कॅमेरा– Mobile Under 7000

itel P40 + या स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध करण्यात आला आहे. यामध्ये प्रायमरी कॅमेरा 13 मेगापिक्सेल, सेकंडरी AI सेंसर कॅमेरा,  आणि समोरील बाजूला 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 12 वर काम करतो. या मोबाईल मध्ये तुम्हाला 4 GB रॅम आणि 228 GB इंटरनल स्टोरेज मिळतंय.