Mobile सायलेंट मोडवर असला तरी शोधणं होणार सोप्प; फक्त करा ‘हे’ काम

टाइम्स मराठी । मोबाईल (Mobile) आज काल अन्न, वस्त्र निवारा या प्रमाणेच आवश्यक घटक बनला आहे. आज काल बऱ्यापैकी कामे ही मोबाईलवरूनच होतात. फक्त मोठी माणसेच नाही तर लहानांमध्ये सुद्धा मोबाईलची मोठ्या प्रमाणात क्रेझ आहे. बराच वेळेस आपण घाई गडबडीमध्ये मोबाईल कुठेही ठेवून देतो. आणि आपण ऑफिसमध्ये असाल तर खास करून मोबाईल हा सायलेंट मोडवर असतो. अशावेळी मोबाईल शोधणे अत्यंत अवघड काम असते. कारण सायलेंट असल्यामुळे मोबाईलवर कॉल केल्यास त्याचा आवाजही येत नाही. परंतु आता असं झाल्यास टेन्शन घेऊ नका. आता ही समस्या देखील दूर होईल. तेही एका फीचर च्या माध्यमातून. जाणून घेऊया नेमकं काय आहे हे फिचर.

   

जाणून घ्या काय आहे हे फिचर

अँड्रॉइडच्या नवीन व्हर्जनच्या माध्यमातून तुम्ही तुमचा अँड्रॉइड मोबाईल शोधू शकतात. जर तुमचा मोबाईल सायलेंटवर असेल तरी देखील तो ट्रॅक करता येऊ शकतो. कारण गुगलमध्ये Find my device या नावाचे अप्रतिम फीचर उपलब्ध आहे. परंतु याबद्दल बऱ्याच जणांना अजून देखील माहिती नाही. या फिचरच्याच माध्यमातून तुम्ही तुमचा मोबाईल ट्रॅक करू शकतात. तुमच्या फोनमध्ये गुगल अकाउंट असेल तर हे फीचर्स ऑटोमॅटिकली काम करते. म्हणजे तुम्हाला यासाठी कोणतेच ॲप किंवा ऑप्शन ऑन करून ठेवावे लागत नाही. याशिवाय तुम्ही हे फीचर ॲप सोबतच बेब मध्ये देखील वापरू शकतात.

जर तुम्हाला देखील हे फीचर वापरायचे असेल तर ही प्रोसेस फॉलो करा.

1) सर्वात पहिले android.com/find किंवा http:www.google.com/android/find/ यावर जा.
2) त्यानंतर तुम्हाला सर्व मोबाईलची लिस्ट दिसेल.
3) ज्यामध्ये तुम्हाला तुमचा ईमेल आयडी लॉगिन करावा लागेल.
4) म्हणजेच वर दिलेल्या दोन्हीपैकी एका वेबसाईटवर त्या ईमेलने लॉगिन करावे लागेल.
5) लॉगिन केल्यानंतर तुम्हाला डाव्या साईडने मोबाईलची रिंग वाजण्याचा पर्याय दिसेल.
6) त्यावर क्लिक केल्यानंतर मोबाईल फोन सायलेंट असताना देखील मोबाईलची रिंग वाजेल.
7) आणि तुम्हाला तुमचा मोबाईल सापडेल.

या मोबाईलद्वारे तुम्हाला रियल टाईम लोकेशन दिसेल आणि ही रिंग पाच मिनिटे सुरू राहील. तुम्हाला तुमचा मोबाईल सापडल्यास तुम्ही पावर बटन प्रेस करून किंवा फाइंड माय डिवाइस वर स्टॉप रिंगिंग प्रेस करून देखील रिंग बंद करू शकतात. खास करून हे फीचर वापरत असताना डिवाइस लोकेट हे नोटिफिकेशन दिसणं गरजेचं आहे.