मोबाईल मधील Restart आणि Reboot यांच्यातील फरक माहितेय का?

टाइम्स मराठी । मोबाईल (Mobile) हा आपल्या जीवनातील अविभाज्य घटक आहे. आजकाल दिवसाची सुरुवात ही मोबाईल बघूनच केली जाते. यासोबतच ऑफिशियल पर्सनल यासारखी बरेच कामे स्मार्टफोनच्या मदतीने केली जातात. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती हा मोबाईल वर अवलम्बुन आहे. प्रत्येक व्यक्ती हा स्मार्टफोनचा वापर करत असून काही व्यक्तींना मोबाईल मध्ये उपलब्ध असलेल्या बऱ्याच फीचर्स बद्दल माहिती आहे. तर काही व्यक्तींना या फीचर्स बद्दल माहिती नाही. तुम्हाला मोबाईल मधील रिबूट (Reboot) आणि  रिस्टार्ट (Restart) या दोन फीचर्स मधील फरक माहिती आहे का? याच दोन फीचर्स मधील फरक आपण आज जाणून घेणार आहोत.

   

जेव्हा आपला मोबाईल हँग पडतो किंवा व्यवस्थित काम करत नाही तेव्हा  आपण स्मार्टफोन रिस्टार्ट  (Restart) करतो. म्हणजेच बंद करून पुन्हा चालू करतो. यासोबतच बरेच व्यक्ती स्मार्टफोन हँग पडल्यावर रिस्टार्ट (Restart) नाही तर रिबूट (Reboot) करतात. बऱ्याच व्यक्तींना रिबूट (Reboot) आणि रिस्टार्ट (Restart) यांच्यातील फरक माहिती नसून त्यांना दोन्ही ऑप्शन सेम वाटतात. परंतु हे ऑप्शन वेगवेगळे असून यामध्ये फरक आहे.

स्मार्टफोन रिबूट (Reboot) करणे

एखादा मोबाईल रिबोर्ट केल्यावर स्मार्टफोन हार्डवेअर नॉन फंक्शनल स्टेट  मधून फंक्शनल स्टेट मध्ये ऍक्टिव्ह होतो. जेव्हा स्मार्टफोन पूर्णपणे काम करतो, परंतु ॲप्लिकेशन व्यवस्थित रिस्पॉन्स करत नाही अशावेळी रिबूट (Reboot) या ऑप्शन चा वापर केला जातो. जेणेकरून स्मार्टफोन  आणि एप्लीकेशन व्यवस्थित काम करू शकेल.

स्मार्टफोन रिस्टार्ट (Restart) करणे

स्मार्टफोन रिस्टार्ट (Restart) करणे म्हणजेच स्मार्टफोन स्विच ऑफ करून स्विच ऑन करणे. जेव्हा एखादे सॉफ्टवेअर स्मार्टफोन मध्ये अपडेट केले जाते, किंवा इन्स्टॉल केले जाते तेव्हा रिस्टार्ट (Restart) हे ऑप्शन वापरतात. स्मार्टफोन रिस्टार्ट (Restart) केल्याने हार्डवेअर वर काम केले जाते. आणि स्मार्टफोन रिबूट (Reboot) केल्यावर सॉफ्टवेअर वर काम केले जाते. हा या दोन्ही फीचर्स मधील फरक आहे.