टाइम्स मराठी । सध्या भारतीय अंतराळ संस्था म्हणजेच ISRO कडून गगनयान मिशनची तयारी सुरू आहे. चांद्रयान तीनने यशस्वीरित्या चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केल्यानंतर ISRO कडून सात मिशन लॉन्च करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यानुसार चांद्रयान तीन नंतर ISRO ने आदित्य एल वन हे मिशन लॉन्च केले होते. आता गगनयान मिशनची तयारी सुरू असून या गगनयान मिशन बाबत प्रधानमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली. मंगळवारी अंतराळातील काही मिशनची रूपरेषा तयार करण्यासाठी आणि तयारी कुठपर्यंत पूर्ण झाली याची शहानिशा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीमध्ये इस्रोचे प्रमुख आणि बरेच अधिकारी देखील उपस्थित होते. यावेळी इस्त्रो प्रमुखांनी मिशन संबंधित बरीच माहिती नरेंद्र मोदी यांना दिली. या बैठकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रो प्रमुख आणि अधिकाऱ्यांना 2035 पर्यंत भारतीय अंतराळ स्टेशन हे मिशन पूर्ण करण्यास सांगितले. यासोबतच 2040 पर्यंत चंद्रावर मानव पोहोचवण्याचे देखील मिशन पूर्ण झाले पाहिजे असं सांगितलं.
2025 पर्यंत होणार गगनयान मिशन लॉन्च
या उच्चस्तरीय बैठकीमध्ये अंतराळ विभागाने गगनयान या अपकमिंग मिशनची माहिती दिली. आतापर्यंत गगनयान मिशन साठी डेव्हलप करण्यात आलेली वेगवेगळी टेक्नॉलॉजी, मानव रेटेड वाहन लॉन्चिंग, सिस्टीम ची योग्यता याबाबत देखील माहिती बैठकीत देण्यात आली. त्याचबरोबर ह्युमन रेटेड लॉन्चिंग व्हेईकल HLVM3 च्या अनक्रुड मिशनच्या माध्यमातून 20 प्रमुख साधनांचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर क्रू एस्केप सिस्टीम टेस्ट व्हिकलची टेस्टिंग 21 ऑक्टोबरला करण्यात येणार आहे. त्याचबरोबर 2025 पर्यंत गगनयान मिशन लॉन्च होणार असल्याचे देखील या बैठकीत सांगण्यात आलं.
भारतीय अंतराळ स्टेशन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या उच्चस्तरीय बैठकीमध्ये सांगितलं की, 2035 पर्यंत भारतीय अंतराळ स्टेशन स्थापन करणे आणि 2040 पर्यंत चंद्रावर पहिला भारतीय मानव पाठवणे हे पुढील महत्वाचे मिशन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय शास्त्रज्ञांना आंतरग्रहीय मोहिमांच्या दिशेने काम करण्याचे आवाहन दिले आहे. यामध्ये व्हीनस ऑर्बिट मिशन आणि मार्सलँडर यांचा समावेश होतो. या बैठकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे क्षमता आणि अवकाश संशोधनावर विश्वास व्यक्त केला.
या बैठकीदरम्यान इस्त्रोने सांगितले की, चंद्रावर संशोधन करण्यासाठी एक रोड मॅप विकसित करण्यात येणार आहे. या मध्ये चांद्रयान मिशनची लिस्ट आणि नेक्स्ट जनरेशन लॉन्च वेहिकल NGLV चा विकास नवीन लॉन्च पॅडची डेव्हलपिंग, मानव केंद्रित प्रयोगशाळा यांची स्थापना आणि वेगवेगळे टेक्नॉलॉजी यांचा समावेश असेल.